gold 
जळगाव

गुढीपाडव्याचा सण..ना नवीन वाहनांची खरेदी ना सोन्याची खरेदी

जळगावला अस्सल सोन्याची बाजारपेठ म्हटली जाते. यामुळे राज्यभरातून नागरिक येथील सोने बाजारात खरेदीसाठी यादिवशी झुंबड करतात

भूषण श्रीखंडे

जळगाव ः मराठी नववर्षाचा मंगळवारी (ता. १३) पहिला दिवस (अर्थात चैत्र महिना) गुढीपाडवा आज हिंदू बांधवांनी घरोघरी गुढी उभारून तिचे पूजन करून साजरा केला. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडव्याला नवीन वाहन, सोने खरेदी केली जाते. काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करीत आनंद लुटतात. यंदा मात्र लॉकडाऊनच्या कडक निर्बंधामुळे नागरिकांना या वस्तूंची खरेदी करता आली नाही. यामुळे केवळ श्रीखंड, आम्रखंड, बासूंदीचा बेत आखून गुढीपाडव्याचा सण गोड करण्यात आला.

मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सकाळी संघाच्या पारंपारीक वेषभुषेत पथसंचलन केले जाते.पथसंचलन पारंपारीक वाद्य वाजवित होत असल्याने शिस्तीचे धडे मिळण्यासोबत सर्वांच्याच आकर्षणचा तो विषय ठरत होता. शस्त्रपूजनही केले जात असे. यंदा कोरोना सावटामुळे हे सर्व बंद होते. हिंदू बांधवांनी सकाळीच नवीन कपडे परिधान करून कुटूंबियांसोबत गुढी उभारली. यादिवशी कडूलिंबाच्या पानांचा रस करून दिला जातो.यामुळे आरोग्यवृ्ध्दी होते. त्यानंतर नातेवाईक, मित्र, मैत्रीणींना मोबाईलवरून किंवा फोन करून शुभेच्छा देण्यात आला.

सोने बाजार ठप्पच

या मुहूर्तावर सोने खरेदी मोठया प्रमाणात होते. जळगावला अस्सल सोन्याची बाजारपेठ म्हटली जाते. यामुळे राज्यभरातून नागरिक येथील सोने बाजारात खरेदीसाठी यादिवशी झुंबड करतात. यंदा अशी झुंबड पहावयास मिळाली नाही. यामुळे सोने बाजारातील आजची मोठी उलाढाल ठप्प होती असे सराफ व्यावसायीकांनी सांगितले.

वाहनेही जागेवरच

गुढीपाडव्याला हजारो नवीन वाहनांची विक्री होते. त्यासाठी नागरिक आगाउ बुकींगही करतात. अनेकांनी बुकींगही केली होती. मात्र कोरोनाचे निर्बंध असल्यान वाहन विक्रेत्यांना वाहनांची डिलेव्हरी ग्राहकांना करता आली नाही. अनेक नागरिकांचे वाहन खरेदी स्वप्न र्पूर्ततेसाठी काही काळ आता द्यावा लागणार आहे. हजारो वाहनांच्या विक्रीतून कोट्यावधीची उलाढाल आज ठप्प झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Caste Verification: महाराष्ट्रात जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी AI चा वापर होणार! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ब्लॉकचेन वापरण्याचे निर्देश

'खाशाबा'च्या टीझरमध्ये नागराज मंजुळेंना पाहिलंत पण त्यांच्या पत्नीला ओळखलंत का? २ सेकंदासाठी दिसलीय झलक

Pune Ashadhi Wari Sevavari: आषाढी वारीत पुणे महापालिकेची ‘सेवावारी’; स्वच्छता, सांस्कृतिक कार्यक्रम, लाखो वारकऱ्यांसह सामूहिक पसायदानाची तयारी

Khashaba Teaser : माजी खासदार संभाजीराजेंनी कोणत्या छत्रपतींची भूमिका साकारली? नागराज मंजुळे दिग्दर्शित चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

Pune Rain: पुणेकरांनो सावधान! पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढणार; घाट विभागाला रेड अलर्ट, अतिवृष्टीचा इशारा

SCROLL FOR NEXT