lockdown
lockdown  
जळगाव

सावधान...लॉकडाउनमध्ये फिरणार तर काय होणार तुमच्यासोबत पहा; १३०० पोलिसांचा कडक बंदोबस्त

सकाळवृत्तसेवा

जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जळगाव महापालिका क्षेत्रासह भुसावळ, अमळनेर पालिका क्षेत्रात उद्यापासून (ता.7) लॉकडाउन सुरू होत आहे. हा लॉकडाउन जनता करफूप्रमाणे जनता लॉकडाउन पाळावा. अत्यावश्‍यक सेवेसाठीच घराच्या दोन किलोमीटर बाहेर पडावे. जिल्ह्यात तेराशे पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. भुसावळला एक एसआरपी प्लाटून असणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

पोलिस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जी. एन.पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते.

७ जुलैच्या पहाटे पाचपासून 13 जुलैच्या रात्री बारापर्यंत लॉकडाउन राहील.  तिनही ठिकाणी सर्वसामान्यांना वाहनांचा वापर करता येणार नाही. फक्त दूध घेण्यासाठी, रुग्णालयात जाणे व औषधासाठी पायी बाहेर पडता येणार आहे. नाक्‍यानाक्‍यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. सर्वसामान्यांना वाहने वापरता येणार नाही. 
याकडक लॉकडाउनमुळे कोरोनोची साखळी तुटण्यास मदत होणार आहे. पेट्रोल पंप सुरू राहतील. अत्यावश्‍यक सेवा असणाऱ्यांना पेट्रोल मिळेल. 
पोलिस अधिक्षक उगले म्हणाले, की आताचा लॉकडाउन कडक असणार आहे. अत्यावश्‍यक कारणाशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई होईल. नाकानाक्यांवर पोलिसांची गस्त असेल. पोलिसांसह होमगार्डही नेमण्यात येतील. १००० ते १२०० पोलिसांची नेमणूक केली आहे. सोबतच मी व इतर पोलिस अधिकारी आहेत. भुसावळला एक एसआरपी प्लाटून आहे. दोन ड्रोनद्वारे तिनही शहरांवर करडी नजर असणार आहे. 
आयुक्त कुलकर्णी म्हणाले, की लॉकडाउन काळात शहरात रुग्ण शोध मोहीम राबविली जाईल. दहा दिवसात हा सर्वे पूर्ण हेाईल. चार प्रभागात ११७ टीम कार्यरत असतील. कुटूंबाचा डेटा याद्वारे संकलित हेाईल. शहरात कोणी दिव्यांग, आजारी असला तर त्याने महापालिकेच्या मोबाईलवर माहिती द्यावी. त्याला मदत केली जाईल. लॉकडाउन काळात सर्व हाकर्स, दुकाने बंद असतील. महापालिकेचे कर्मचारी कारवाईसाठी रस्त्यावर असतील. 

वाहन वापरण्यास बंदी 
लॉकडाउनच्या काळात नागरिकांना फक्‍त दोन किलोमीटर परिसरातील औषधे, दूध घेण्यासाठी परवानगी असेल. नागरिकांना दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने वापरण्यास बंदी आहे. एमआयडीसीतील कंपन्यांसाठी होणारी वाहतूक केवळ सुरू राहील. जळगाव, भुसावळ व अमळनेर शहर वगळता ग्रामीण भागात व इतर पालिका क्षेत्रात सर्व व्यवहार सुरू राहणार आहेत. 

बाजार समितीत फक्त ठोक विक्री 
जळगाव, भुसावळ व अमळनेर बाजार समितीत केवळ घाऊक व ठोक विक्री होईल. किरकोळ खरेदी-विक्री करणाऱ्यांना बाजार समितीत परवानगी नाही. रुग्णांना डॉक्‍टरांची गरज असेल, तरच वास्तव्यास असलेल्या प्रभागाबाहेर जाता येणार आहे. बी-बियाणे, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी संबंधित क्षेत्राबाहेर जाता येईल. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांना शेतीचा सातबारा उतारा जवळ बाळगावा लागणार आहे. लॉकडाउन क्षेत्रातील पेट्रोल पंपचालकांना फक्‍त अत्यावश्‍यक सेवांच्या व्यक्‍तींना पेट्रोल, डिझेल विक्रीची परवानगी आहे. 

ही दुकाने असतील बंद 
लॉकडाउनच्या काळात किराणा दुकान, लिकर शॉप, सलून दुकाने, खासगी कार्यालय, कुरिअर, इलेक्‍ट्रिशियन, प्लंबर, गॅरेज- वर्कशॉप आदी दुकाने, उद्याने बंद राहतील. 
 
हे असेल सुरू 
मेडिकल, हॉटेल- रेस्टॉरंट (पार्सल सुविधा), ओपीडी, दूध खरेदी-विक्री केंद्र, शेतीकामे, कृषी केंद्र, शासकीय कार्यालय, बॅंका, पोस्टल सेवा. 

इतर क्षेत्रात हे सुरू 
जळगाव, भुसावळ, अमळनेर वगळता इतर क्षेत्रात प्रवासी वाहतूक, बस, टॅक्‍सी, रिक्षा, चारचाकी- दुचाकी वाहने, हॉटेल- रेस्टॉरंट (पार्सल सुविधा), मेडिकल, ओपीडी, भाजीपाला- फळे, दूध खरेदी-विक्री, शेतीकामे, कंपनी, शासकीय व खासगी बांधकाम, कृषी केंद्र, किराणा दुकान, लिकर शॉप, सलून, खासगी व शासकीय कार्यालय, बॅंका, कुरिअर, गॅरेज, वर्कशॉप, उद्याने सुरू असतील. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT