जळगाव

मागून हल्ला केला, पुढून केला असता तर माझ्या यशने किमान 3 जणांना तरी मारलं असतं

भूषण श्रीखंडे

जळगाव : जम्मू काश्मीर मधील श्रीनगर येथे 26 नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्काराचे दोन जवान शहीद झाले. यात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील यश देशमुख हे जवान शहीद झाले. शहीद यश यांच्यावर आज शासकीय इतमात अंत्यसंस्कार झाले. अंत्यसंस्कारापूर्वी एका वृत्त वाहिनीशी बोलतांना शहिद जवान यशचे वडिल दिगंबर देशमुख म्हणाले, की अतिरिक्यांनी भ्याड पद्धतीने मागून हल्ला केला. त्यांनी पुढून हल्ला केला असता तर माझ्या यशने तिन जण तरी मारले असते अशी प्रतिक्रिया दिली. 


श्रीनगर जवळील एचएमटी भागात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर तीन दहशतवाद्यांनी अचानक हल्ला झाला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले तर तीन जवान जखमी झाले होते. भ्याड हल्यात चाळीसगावचे यश देशमुख हे जवान शहिद झाले. आपल्या मुलांच्या आठवणी सांगतांना यशचे वडील दिगंबर देशमुख म्हणाले, की यश सप्टेंबर महिन्यात घरी आला होता. 2 ऑक्टोबरला पून्हा आपले कर्तव्य बजाविण्यासाठी परत गेला. आमचे 4 दिवसांपूर्वी फोनवर देखील बोलणं झालं होत असे सांगितले.

आणि अधिकाऱयांचा फोन आला
शहीद जवान यश यांचे वडील म्हणाले, की भारतीय लष्करी आधिकाऱयाचा मला गुरुवारी फोन आला आणि म्हणाले, की तो खूप जिद्दी होता, परिस्थितीची त्याला जाणीव होती मात्र असं त्यांनी सांगितलं.


वर्षभरापुर्वीच मल्ट्रीत भरती
यश देशमुख हे गेल्या वर्षी मिल्ट्रीमध्ये भरती झाले होते. गेल्या तीन महिन्यांपासून काश्मीरमध्ये त्याची नेमणूक करण्यात आली होती. शेतकरी कुटुंबातील असलेल्या यशच्या शहीद होण्याने त्याच्या पिंपळगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली असल्याचं पाहायला मिळत आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT