जळगाव

महापौर एक्शन मोडमध्ये; सरप्राईज व्हिजीट देवून स्वच्छतेच करणार पाहणी

सचिन जोशी

जळगाव  : वॉटरग्रेसच्या कामात रोज कर्मचाऱ्यांचा हजेरी तक्ता आणि प्रत्यक्षात कार्यरत असलेले कर्मचारी यात तफावत आढळून आल्यास बडतर्फीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौर भारती सोनवणे यांनी दिला. 

वॉटरग्रेसला काम करण्यासाठी आवश्यक त्या पूर्तता महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर करून द्याव्यात. वॉटरग्रेसकडून काम करून घेण्याची जबाबदारी प्रत्येक आरोग्य निरीक्षकाने चोख पार पाडावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. 


सोमवारी महापौरांनी त्यांच्या दालनात बैठक बोलावली होती. स्थायी समिती सभापती ॲड. शुचिता हाडा, आयुक्त सतीश कुलकर्णी, गटनेते भगत बालाणी, नवनाथ दारकुंडे, ॲड. दिलीप पोकळे, आरोग्याधिकारी उदय पाटील, विकास पाटील, मलेरिया विभागप्रमुख सुधीर सोनवाल, वॉटरग्रेसचे प्रतिनिधी, आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. 

...तर वॉटरग्रेसला नोटीस 
महापालिका प्रशासनाने पूर्तता तत्काळ पूर्ण कराव्यात. वॉटरग्रेसकडून काही हलगर्जी झाल्यास त्यावर कारवाई करताना अडचण येणार नाही, असे महापौर म्हणाल्या. 

मोकळ्या जागामालकांना नोटीस 
सर्व व्यापारी संकुले, औद्योगिक वसाहत, बाजारपट्टा साफसफाई करा, रात्रीची साफसफाई मोहीम तीव्र करा, मनुष्यबळ वाढवा, गटारींच्या काठावर वाढलेली झुडपे साफ करा, ज्या खासगी मोकळ्या जागांवर कचरा टाकण्यात येतो त्या जागामालकांना नोटीस बजवा, अशा सूचना नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मांडल्या. 

‘सरप्राइझ व्हिजिट’ करणार 
स्वच्छतेचे काम योग्य प्रकारे होते आहे की नाही, हे तपासण्यासाठी महापौर, नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांना घेऊन अचानक पाहणी करणार आहेत. आपल्या परिसरात स्वच्छता होत नसल्यास किंवा कचरा संकलन केले जात नसल्यास नागरिकांनी (०२५७-२२२६५२५) या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.  

 संपादन-भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT