जळगाव

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मामानेच केले कृत्‍य

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मामानेच केले कृत्‍य

सकाळ डिजिटल टीम

यावल (जळगाव) : चुलत आत्याच्या पतीने भाचीवरच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासला आहे. ही घटना यावल तालुक्यात आदिवासी पाड्यावर घडली. तालुक्यातील दुर्गम भागातील जामुनझिरा या आदिवासी पाड्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्यावरून एका संशयिताविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon-Molestation-of-minor-girl-uncle-torture)

जामुनझिरा येथे २३ जूनला दुपारी अडीच ते चारच्या दरम्यान पीडित १२ वर्षीय मुलीची आई शेतात पेरणीसाठी गेली असता त्यांच्या घराशेजारी राहणारा संशयित रमा देवसिंग बारेला याने मुलीच्या घरात घुसून तिला घराशेजारील गुरांच्या चाऱ्याच्या खोली नेऊन अश्लील कृत्य करीत विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी पीडित मुलीने आरडाओरड केल्यावर संशयित रमा बारेला घटनास्थळावरून फरार झाला.

कुटुंबीयांना उशिराने समजली घटना

पीडित मुलीने ही घटना आपल्या कुटुंबीयांना उशिरा सांगितली. पीडित मुलीच्या आईने सोमवारी (ता.२८) येथील पोलिस ठाण्यात गुन्ह्यातील संशयित रमा देवसिंग बारेला याच्या विरुद्ध तक्रार दिल्यावरून विनयभंगासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद खांडबहाले तपास करीत आहेत. गुन्हा केल्यापासून संशयित फरार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Foundation Day : मोठे मोठे पेच सोडवले, भाजपचे आता दोनच मुद्दे; PM मोदींनी स्थापना दिनी सांगितली पुढची वाटचाल

भाजपच्या स्थापनेमागेही नेहरूच! मंत्रिमंडळातल्या एका राजीनाम्याने झालेली जनसंघाची सुरुवात

Sunetra Pawar : 'दादांनंतरची ही पहिलीच निवडणूक, त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्याची बारामतीकरांना संधी'; पोटनिवडणुकीबाबत काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?

Numerology : फारच भोळे असतात 'या' २ मुलांकाचे लोक! प्रेमात सतत खातात धोका; कुणीही सहज फसवून जातं, तरीही आयुष्यभर राहतात निरागस

Nanded Gangwar : गँगवॉरने नांदेड हादरले, भर रस्त्यावर तरुण नेत्याची निर्घृण हत्या; तीन दिवसांत पाच खून

SCROLL FOR NEXT