Ajanta Caves 
जळगाव

खासदार सुप्रिया सुळेंची अजिंठा लेणीला भेट

गाईड सय्यद अबरार यांच्याकडून लेणीतील चित्रशैली व शिल्पकलेबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली.

विलास जोशी


वाकोद (ता. जामनेर) :
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीस (Ajanta Caves) मंगळवारी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी भेट दिली. खासदर सुळे यांनी लेणीतील चित्रशैली व शिल्पाचे बारकाईने निरीक्षण करून अजिंठा लेणीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली. तसेच निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला.


खासदार सुळे यांचे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास फर्दापूर येथील अजिंठा लेणी टी पॉइंटवर आगमन झाले. येथून त्यांनी अजिंठा लेणीकडे प्रयाण केले. दरम्यान, लेणी क्रमांक १ ते २६ या संपूर्ण लेण्यांची सुमारे अडीच तासापर्यंत त्यांनी अत्यंत बारकाईने पाहणी करून गाईड सय्यद अबरार यांच्याकडून लेणीतील चित्रशैली व शिल्पकलेबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच अजिंठा लेणीतील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सप्तकुंड परिसराला भेट दिली.

दरम्यान, या वेळी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या रसायन शाखेच्या एक तृतीयांश श्रेणी प्राप्त अस्थायी कर्मचाऱ्यांनी खासदार सुळे यांना निवेदन देऊन अस्थायी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याची मागणी केली. या वेळी खासदार सुळे यांच्यासोबत भारतीय पुरातत्व विभागाचे वरिष्ठ संवर्धन सहाय्यक डी. एस दानवे, के. के. शेख पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापक रामदास क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.


जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांना भेट दिली. या लेण्यांमधील चित्रकला अद्भुत आहे. भारतीय चित्रकलेचा हा अतिशय सुंदर अविष्कार असून, हा देशाचा उज्ज्वल असा वारसा आहे.

-सुप्रिया सुळे, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: राज्य सरकारला दणका, 'तो' निर्णय हायकोर्टानं केला रद्द

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा 21वा हप्ता 'या' दिवशी येऊ शकतो

Mumbai : ठाकरे बंधूंसह मविआचे नेते पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेणार, पण शरद पवार अनुपस्थित

Cancer Treatment: कॅन्सरचा संसर्ग होण्याआधीच थांबवणार सुपर व्हॅक्सीन; उपचारात घडणार क्रांती

खरंच रानू मंडल वेडी झालीय? 5 वर्षात अशी झाली अवस्था, घरात कीडे तर खाण्याचे हाल तरीही, मध्येच हसते, मध्येच रडते

SCROLL FOR NEXT