unmesh patil 
जळगाव

जळगाव जिल्ह्यात माता-शिशूंसाठी हॉस्पिटल; तंत्रज्ञान उपकेंद्रही होणार  ​

सचिन जोशी

जळगाव : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गर्भवती मातांची प्रसूती व नवजात शिशूंच्या लसीकरणापर्यंतच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे ३० कोटींचे हॉस्पिटल या केंद्रीय अर्थसंकल्पातील मोठी उपलब्धी आहे. सोबतच सूक्ष्म व लघु उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या तंत्रज्ञान केंद्राचे उपकेंद्रालाही मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी दिली. 


केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी व जळगाव जिल्ह्यासाठीच्या उपलब्धींबाबत त्यांनी आज भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजाराने कमालीची उसळी घेतल्याची घटना गेल्या २० वर्षांत यंदा प्रथमच घडली आहे. आरोग्य, पायाभूत सुविधा, कृषी, ग्रामीण व शहरी विकास अशा पाच घटकांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुदी आहेत. कोरोनासारख्या वैश्‍विक महामारीचा विदारक अनुभव लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने त्यात तब्बल १३४ टक्के वाढ करून सुमारे दोन लाख २६ हजार कोटींची तरतूद केली असून, ही मोठी बाब असल्याचे खासदार म्हणाले. या वेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, महापौर भारती सोनवणे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, मच्छिंद्र पाटील, महेश जोशी, मनोज भांडारकर आदी उपस्थित होते. 

जिल्ह्यासाठी हे महत्त्वाचे 
- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गर्भवती माता, शिशूंसाठी स्वतंत्र हॉस्पिटल 
- देशभरात ३५० क्रिटिकल केअर युनिट उभारण्यात येणार असून, जिल्ह्यातही ते व्हावे यासाठी पाठपुरावा 
- मालवाहतुकीची आधुनिक सोय व प्रवासी वाहतुकीसाठी भुसावळ- खरगपूर (प. बंगाल) स्वतंत्र कॉरिडॉर 
- भुसावळ- जळगाव चौथी, जळगाव- मनमाड तिसरी रेल्वे लाइन, उधना- जळगाव दुसरी लाइन व विद्युतीकरणासाठी तरतूद 
- सूक्ष्म व लघु उद्योगांच्या विकासासाठी औरंगाबाद येथे तंत्रज्ञान केंद्र मंजूर. त्याअंतर्गत उपकेंद्र जळगावात होणार 

बदल्याचे नव्हे ‘बदला’चे राजकारण 
जिल्ह्यातील जलसंपदामंत्री असूनही प्रकल्पांना निधी मिळाला नसल्याच्या एकनाथ खडसेंच्या आरोपाबाबत बोलताना उन्मेष पाटील म्हणाले, जिल्ह्यातील बदल्याच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. आता लोकांना बदल हवा आहे. ही वेळ तुम्ही-आम्ही करण्याची नाही, तर आपण म्हणून लोकांसाठी काय विकासात्मक देऊ, नाथाभाऊंच्या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा आम्ही काम करू.  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिला सामना १३ ऐवजी १४ सप्टेंबरला? पोलिसांच्या पत्रानंतर काय निर्णय झाला? महत्त्वाच्या अपडेट्स

Marathi News Live Updates : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला

केंद्राचा आदेश पण कर्नाटक भूमिकेवर ठाम! काँग्रेसच्या १९३७ सालच्या ठरावाचं होणार पालन, DK सरकारचा आदेश नेमका काय?

Bail Pola Festival : जात-पात विसरून एकाच माळेत; अमळनेर वस्तीत हिंदू-मुस्लिम बांधवांचा बैलपोळा उत्साहात

MPSC paper leak confession : व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट आहे, हे आम्हीही मान्य करतो ; आमदार विक्रम पाचपुते यांची स्पष्टोक्ती

SCROLL FOR NEXT