Fruit farm 
जळगाव

पुनर्रचित हवामानाच्या आधारावर शेतकऱ्यांना मदत मिळावी-खासदार पाटील

1 जुलै ते 31 जुलै या कालावधीमध्ये कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देय आहे.

भूषण श्रीखंडे

फळपिक विमा योजना सन 2021-22 अंतर्गत मोसंबी या फळाचे झालेल्या नुकसानीच्या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी.

जळगाव ः लोकसभा मतदार संघातील एक प्रमुख फळ पीक (Fruit crop) म्हणून मोसंबी (Citrus) या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी (Farmers) केलेली आहे व करीत आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजना (Pradhan Mantri Pik Yojana) अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (Fruit Insurance Scheme) मध्ये मोसंबी या फळपिकाच्या मृग व आंबिया बहाराचा समावेश केलेला आहे.

खरीप हंगामात जळगाव जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने मोसंबी फळ पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात "फळगळ" होत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. या बाबत तज्ञांकडून माहिती घेतली असता Water Stress/Extreme Change in Temprature कारणाने "फळगळ" होत असल्याचे कळाले. असून होणाऱ्या नुकसानींचे फळपिक विमा योजना सन 2021-22 अंतर्गत मोसंबी या फळाचे झालेल्या नुकसानीच्या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे.

Fruit farm Damage

शेतकऱ्यांमध्ये संताप

खासदार उन्मेश पाटील म्हटले आहे की मोसंबी फळ पीक विम्याचे प्रमाणके (ट्रिगर) बघितले असता निदर्शनास येते की दिनांक.1 जुलै ते 31 जुलै या कालावधीमध्ये कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देय आहे. तसेच पावसाचा खंड पडल्यावर देखील नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांशी तसेच भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचेशी चर्चा केली यात शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे सदरील नुकसानीबाबत माहिती दिलेली असून आजतागायत कुठलेही विमा कंपनीचा प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची पडताळणी केली नाही. हे अतिशय खेदजनक बाब असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Fruit farm Damage

तात्काळ नुकसानीचे माहिती संकलन करावी

तात्काळ संबंधित यंत्रणेला आदेश देऊन मुख्यतः पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर भडगाव व चाळीसगाव तालुक्यातील गावे या ठिकाणी विमाधारक शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर जाऊन झालेल्या नुकसानीची माहिती तात्काळ संकलित करण्यात यावी व तसा अहवाल विमा कंपनी व शासनास सादर करण्यात यावा. तसेच ज्या शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले नसल्यास अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल महसूल व कृषी विभाग यांच्या संयुक्त संकलित करून आपणा मार्फत शासनास अहवाल सादर करण्यात यावा.अशी आग्रही मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT