जळगाव

मुंबई विमानतळावरून स्लॉट मिळेना... जळगाववरून विमान उड्डाणाबाबत अनिश्‍चतता !

सकाळवृत्तसेवा

जळगाव :  जळगावकरांना जळगाव ते मुंबई जाण्यासाठी विमानसेवेचा पुनःशुभारंभ 1 जूनपासून होणार होता. त्यादृष्टीने विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तयारीही केली आहे. मात्र ट्रुजेट कंपनीला अजून मुंबई येथे विमानतळावर विमान उतरविण्यासाठी स्लॉट देण्यात आला नसल्याने विमान उड्डाणाबाबत अद्याप अनिश्‍चतता आहे. 

कुसुंबा येथील विमानतळावरून तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर विमानसेवा 1 जून पासून सुरू होईल. केंद्र व राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यास यंत्रणा सज्ज झाली आहे.विमानाने येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यासाठी सहा डॉक्‍टरांचे पथक नेमले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी निलाभ रोहन यांनीही विमानतळावरील सोशल डिस्टन्स, सुरक्षितता आदी बाबत पाहणी केली. 

जो प्रवासी विमानाने मुंबई, अहमदाबाद वरून जळगावला येईल त्यांना 14 दिवस होमक्वारंटाईरन व्हावे लागणार आहे. तर जो विमानाने मुंबई, अहमदाबाद येथे जाईल त्यांना प्रतिज्ञापत्राद्वारे मला "कोरोना' नाही असे लिहून द्यावे लागणार आहे. प्रवाशांची आरोग्य तपासणी होणार आहे. "आरोग्य सेतू' ऍप प्रत्येक प्रवाशाला डाऊनलोड करावा लागणार आहे. या ऍपवर जर ग्रीन लाईट असेल तरच प्रवाशाला विमानाने जाऊ दिले जाईल. रेड लाईट असेल तर प्रवास नाकारला जाणार आहे. 

तीन दिवस मुंबईसाठी 
1 जूनपासून विमान सेवा सुरू होत असली तरी मंगळवार गुरुवार, शनिवार हे तीन दिवस मुंबईला जाण्यासाठी असतील. अहमदाबादला जाण्यासाठी सहा दिवस सेवा असेल. रविवारी सुटी असेल. 

स्लॉट आल्यानंतर उड्डाण 
याबाबत ट्रुजेट कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ट्रूजेट कंपनीने मुंबई, अहमदाबाद येथे विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्या "कोरोना'मुळे मुंबईत विमानतळावर केवळ 25 विमानाचाच उतरू देतात व तेवढ्याच विमानाना उड्डाण घेऊ देणार आहे. ट्रूजेट कंपनीसह अनेक कंपन्यांनी आम्हाला स्लॉट मिळावा अशी मागणी राज्य शासनाकडे केली. मुंबईत विमान उतरविण्याचा स्लॉट मिळाला तर नक्कीच सेवा सुरू होईल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT