जळगाव

महापौरांच्या विनंतीवरून मुंबईच्या आमदारांनी अँटीजन टेस्ट किटसाठी दिला निधी

भूषण श्रीखंडे

जळगाव ः  शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून बऱ्याच वेळा अँटीजन टेस्ट किटचा तुटवडा निर्माण होत आहे. जळगाव मनपाला अँटीजन टेस्ट किट देण्यासाठी राज्यातील काही मान्यवरांना महापौर भारती सोनवणे यांनी विनंतीपत्र पाठविले असता मुंबई विधानपरिषद सदस्य आमदार रमेश पाटील यांनी ८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 

जळगाव शहरातील नागरिकांची कोरोना तपासणी तात्काळ होण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी शासन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करून अँटीजन टेस्ट किट उपलब्ध करून घेतल्या होत्या. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अँटीजन टेस्ट किटचा तुटवडा भासू लागला. नागरिकांची तात्काळ तपासणी होण्याकामी महापौर भारती सोनवणे यांनी राज्यातील काही मान्यवरांना पत्र पाठवून अँटीजन टेस्ट किट उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली होती. तसेच मनपा फंडातून देखील अँटीजन किट खरेदी करण्यासाठी आयुक्तांना पत्र दिले होते.

आमदार पाटील यांनी दिला निधी
महापौर सौ सोनवणे यांच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबई येथील भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार रमेश नारायण पाटील यांनी स्थानिक विकास निधी अंतर्गत  ८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जळगाव मनपाला अँटीजन टेस्ट किटचा मुबलक पुरवठा करण्यासाठी या निधीचे नियोजन करावे असे पत्र आमदार पाटील यांनी महापौर यांना दिले आहे. महापौरांनी सदर पत्राची प्रत जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी यांना दिली आहे.

शहरवासियांना होणार फायदा : महापौर
जळगाव शहरासाठी निधी उपलब्ध झाल्याने त्यातून पुन्हा नव्याने अँटीजन टेस्ट किट खरेदी करता येणार आहे. त्यामुळे जळगाव शहरवासियांना फायदा होणार असून त्यांची कोरोना चाचणी तात्काळ करून त्यांना वेळीच उपचार देणे शक्य होणार आहे. राज्यातील आणखी इतर काही मान्यवरांशी संपर्क केला असून त्यांच्याकडून देखील महापालिकेला मदत होण्याची शक्यता असल्याचे महापौरांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT