जळगाव

आरोप सिद्ध करा; अन्यथा राजीनामा द्या:  स्थायी सभापती ऍड. शुचिता हाडा

सकाळवृत्तसेवा

जळगाव  : "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर शहरातील दोन्ही आमदारांनी प्रत्येकी 50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासाठी पात्र निविदाधारक एजन्सीला निविदा देण्यात आली असून, सुनील महाजन यांनी केलेले आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन आहेत, असा दावा करतानाच आरोप सिद्ध करा; अन्यथा राजीनामा द्या, असा सल्ला स्थायी समितीच्या सभापती ऍड. शुचिता हाडा यांनी पत्रकार परिषदेत दिला. 


विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी स्थायी सभापतींचे पती अतुलसिंग हाडा भागीदार असलेल्या एजन्सीला निविदा मिळावी म्हणून निविदा अटीत बदल केल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात आज महापालिकेत महापौर दालनात स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेत्यांचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून निविदेच्या या प्रक्रियेत सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचा काहीएक संबंध नाही. निविदा प्रक्रिया ही शासनाच्या नियमांप्रमाणे पार पडली असून, विरोधी पक्षनेत्यांना निविदा प्रक्रिया कोणत्या निकषांनुसार केली जाते हे सुद्धा माहिती नसून त्यांनी विनाकारण असे हास्यास्पद आरोप करू, नये असे सांगून प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया शासनाच्या कोणत्या निकषांद्वारे पार पडते हे देखील त्यांनी यावेळी सांगितले. 


केविलवाणा प्रकार 
सुनील महाजन हे विरोधी पक्षनेते असल्याने ते सतत कोणताही पुरावा हातात नसताना आरोप करीत सुटतात हा त्यांचा केविलवाणा प्रकार असून, शासनाच्या नियमांच्या आधारे अत्यंत पारदर्शीपणे निविदेची प्रक्रिया पार पडत असून, त्यांनी असे आरोप करणे चुकीचे आहे. 


महाजनांना समुपदेशनाची गरज 
"लॉकडाउन'मुळे विरोधी पक्षनेते महाजन यांचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसून त्यांना आता समुपदेशनाची गरज आहे. त्यांना निविदा विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार असूनही ते कोणावरही बेछुटपणे आरोप करीत आहेत. 

..अन्यथा राजीनामा द्या 
निविदा प्रक्रियेबाबत कोणतेही पुरावे नसताना विरोधी पक्षनेत्यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे; अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असेही ऍड. हाडा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT