जळगाव

वेळ संपली तरी दुकाने सुरूच, मनपाकडून ६० दुकाने सील 

भूषण श्रीखंडे

जळगाव : सर्व व्यापारी संकुलातील दुकाने आठवड्यात चार दिवस सुरू, तर तीन दिवस बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. तरीही दिलेल्या वेळेनंतरही गोलाणी मार्केटमधील अनेक दुकाने बुधवारी (ता. १३) सुरू असल्याचे उपायुक्त संतोष वाहुळे यांना आढळून आले. त्यावरून शुक्रवारी (ता. १४) येथील साठ दुकाने सील करण्यात आली. दुसरीकडे वेळेत दुकाने बंद करणाऱ्या दुकानदारांचे पुष्पगुच्छ देऊन उपायुक्तांनी स्वागतही केले. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व व्यापारी संकुलातील दुकाने ५ ऑगस्टपासून मंगळवार, गुरुवारी आणि शनिवारी बंद ठेवून इतर दिवशी उघडण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. त्यानुसार फुले मार्केट, सेंट्रल फुले, गांधी मार्केट, दाणा बाजार आणि गोलाणी मार्केटसह अन्य मार्केटमधील दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात या दहा तासांच्या कालावधीत दुकाने उघडण्याचा नियम केला होता. मात्र, गोलाणी मार्केटमधील दुकाने सायंकाळी वेळ संपल्यावर तसेच बंदच्या दिवशीही सुरू असल्याच्या अनेक तक्रारी उपायुक्तांकडे आल्या होत्या. त्याची दखल घेत उपायुक्त वाहुळे यांनी बुधवारी सायंकाळी सातनंतर गोलाणी मार्केटमध्ये येऊन अशा दुकानांचे चित्रण केले होते. सुरू असलेली दुकाने शुक्रवारी दुपारी पोलिस बंदोबस्तात सील करण्यात आली. 

...तर संकुल बंद करू 
महापालिका प्रशासन वेळोवेळी सूचना देत आहे. तरीही व्यावसायिक ऐकत नाहीत. हे प्रकार असेच सुरू राहिल्यास आणि दुकानदारांनी प्रशासनास सहकार्य न केल्यास १५ ऑगस्टनंतर पुन्हा सर्व मार्केटमधील दुकाने बंद करण्यात येतील, असा इशाराही उपायुक्त वाहुळे यांनी दिला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: शफाली वर्माचे २४ चेंडूत अर्धशतक अन् दोन वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृती मानधनालाही तिच्याच समोर टाकलं मागे

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेणारा अनिल पंडित कोण? लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध...

11 Fours, 2 Sixes... रिंकू सिंगचं सलग दुसरं शतक! आता तरी टीम इंडियात पुन्हा जागा मिळणार का?

पुढच्या २१ दिवसांत ३ राशींना धनलाभाची संधी, करिअर अन् व्यवसायात होऊ शकते प्रगती

IND W vs ZIM W, 2nd T20I: शफालीचं वादळी अर्धशतक अन् स्मृतीचंही आक्रमण, भारताने विजयासह मालिकाही टाकली खिशात

SCROLL FOR NEXT