जळगाव

जिल्हाधिकारी, मनपाने  आमचा ‘फुटबॉल’केला ; संकुलातील व्यापारी आक्रमक !

देविदास वाणी

जळगाव  ः राज्यात सर्वत्र व्यापारी संकुले सुरू करण्यात आली आहे. मात्र कोरोना संसर्गाचे कारण पुढे करीत शहरातील सेंट्रल फुले मार्केट, फुले मार्केटसह तब्बल ३५ मार्केट बंद ठेवण्यात आली आहे. ४ महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाने व्यापारी संकुले सुरू करू न दिल्यास आम्ही ‘भीक मांगो’ आंदोलन करू, अन्यथा आत्महत्येचा मार्ग स्वीकारू, असा गंभीर इशारा शहरातील व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. 

नटवर कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष सपनभाई झुनझुनवाला, विजय अग्रवाल, सराफ व्यावसायिक असोसिएशनचे स्वरूप लुंकड, सेंट्रल फुले मार्केटचे अध्यक्ष रमेश मताणी, फुले मार्केटचे राजेश वरयानी, सेंट्रल फुले मार्केटचे माजी अध्यक्ष प्रदीप जैन, नाथ प्लाझाचे अध्यक्ष नितीन वाणी, दीपक मंधान, संजय हिरानी, भरत समदडीया, बाबुशेठ कौरानी आदी व्यापारी यावेळी उपस्थित होते. 

व्यापाऱ्यांचा ‘फुटबॉल’ 
दुकाने सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांना निर्दयीणाची वागणूक देतात. जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले तर महापालिकेकडे जा, महापालिकेकडे गेले तर जिल्हाधिकाऱ्यांकडे, शासनाकडे बोट दाखविते. आमचा फुटबॉल केला जातो, असे ते म्हणाले. दुकाने सुरू करण्याबाबत काहीच बोलत नाही. आमच्याकडून जीएसटी, विविध कर मात्र वसुल केले जातात. कारवाईसाठी फुले मार्केट, बळीरामपेठेतील दुकानेच दिसतात का ? आयुक्त पाच ते दहा हजारांचा दंड कोणत्या नियमानुसार लावतात. ४ महिन्यापासून दुकाने बंद असल्याने २०२०-२१ ची भाडे घरपट्टी, दुकानाची पट्टी इतर कर आकारण्यात येवू नये. ती माफ करावी. 

‘भिक मांगो’नंतर आत्मदहन 
४५ हजार जणांचा रोजगार दुकाने बंदमुळे हिरावण्यात आला आहे. एक लाख नागरिकांचे पालन पोषण ४५ हजार कर्मचारी करतात. दोन- तीन दिवसांत व्यापारी संकुले सुरू करण्यास परवानगी न दिल्यास दुकानातील सर्व कर्मचारी भिक मांगो आंदेालन करतील, तरीही शासन, प्रशासनाला जाग आली नाहीतर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

ज्या महापालिका रेडझोन मध्ये आहेत तेथील व्यापारी संकुले, मॉल सुरू करण्यास शासनाने परवानगी दिलेली नाही. ३० जूनच्या आदेशानुसार जळगाव महापालिका रेड झोनमध्ये आहे. यामुळे येथील व्यापारी संकुले सुरू करता येऊ शकत नाही. शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करीत आहोत. 
- सतीश कुलकर्णी, आयुक्त, मनपा 


संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT