जळगाव

अरे हे काय...चक्क महापौर दररोज कोविड सेंटर मध्ये जेवण करणार, कशासाठी ? वाचा सविस्तर  !

भूषण श्रीखंडे

जळगाव ः शहर महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या आहे. त्यामुळे रुग्णांना दिल्या सोयी सुविधा बाबत महापौरांकडे तक्रारी येत होत्या. त्यात जाणाऱ्या जेवणाबाबत काही तक्रारी महापौरांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी आज स्वतः सकाळी कोविड सेंटरवर नाश्ताचा आस्वाद घेवून गुणवत्ता तपासली.

जळगाव शहर व ग्रामीण मध्ये दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरातील महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दररोज सोयी सुविधांच्या तक्रारी वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात मंगळवारीच दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोविड सेंटरमध्ये मद्याची शाळा भरवून दांगडो केला होता. त्यात रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या जेवणाबाबत महापौरांकडे वेळोवेळी तक्रारी प्राप्त होत असल्याने आज सकाळी महापौर सौ सोनवणे स्वतः त्याठिकाणी पोहचल्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, प्रशांत नाईक उपस्थित होते.

दररोज कोविड सेंटरमध्ये करणार जेवण
कोविड केअर सेंटरमधील जेवणाचा दर्जा आणि गुणवत्ता योग्य राहावी यासाठी महापौर स्वतः आता लक्ष ठेवून असणार आहे. त्यानुसा दररोज कोविड सेंटरमध्ये मध्ये नाश्ता आणि जेवण करणार आहे. त्यानुसार त्यांनी आज सेंटरमध्ये रग्णांसाठी आलेल्या मिळालेल्या नाश्ताचा आस्वाद घेवून गुणवत्ता तपासली.

दररोज होतोय गोंधळ…
महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दररोज कोरोना बाधित रुण तसेच क्वारटांईन झालेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईंकडून गोंधळ घातला जात आहे. त्यात वाढत्या रुग्ण संख्येमुळे दिल्या जाणाऱ्या सुविधांवर देखील याचा परिणाम पडत आहे. त्यामुळे रुग्ण, संशयीत तसेच रुग्णांच्या नातेवाईकांचा महापालिका कर्मचारी, डॉक्टर, नर्स, सुरक्षा रक्षक यांच्या सोबत वादाचे खटके उडत आहे.

शहरात पंधराशेच्या वर कोरोना बाधित
शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी ९४ रुग्ण वाढले असून शहरात १ हजार पाचशे सत्तर रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरात कोरोना बाबत चितांजणक परिस्थीती बनत चालली आहे. 
   

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : दिलासादायक ! राज्यात पाऊस परतणार; कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात धो धो कोसळणार, १० जिल्ह्यांना येलो अलर्ट

Navratri Upvas Recipe: उपवासाला तेच तेच खाऊन कंटाळा आलाय? बनवा खमंग अन् चटपटीत 'उपवासाचा समोसा'!

Mangalwedha Crime : जवळ झोपून न देणाऱ्या पत्नीचा रॉकेलने पेटवून खून; पतीस शिक्षा

Mumbai Crime : सीएसएमटीतून चिमुरडीचे अपहरण! १४ तासांत शोध, अपहरण करणाऱ्या महिलेला अटक; एक वर्षाच्या मुलीला आईच्या स्वाधीन केले

FDA Crime : कऱ्हाडमधुन एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा; राज्यात अन्नसुरक्षेसाठी कारवाई आणखी कडक करणार

SCROLL FOR NEXT