जळगाव

खुनाच्या घटनेने पुन्हा हादरले भुसावळ

चेतन चौधरी

भुसावळ :  भुसावळ शहरात रविवारी रात्री 19 वर्षीय युवकाच्या छातीवर वार करून खून केल्याची घटना खडका रोड भागात रविवारी (ता. १३) रात्रीच्या सुमारास घडली असून, यामुळे शहरात एकच खळबळ उडाली
आहे. 


शहरातील हॉटेल बाबला परीसरातील कमलाबाई बिल्डिंग मधील रहिवासी अल्तमश शेख रशीद (वय 19) याच्यावर हल्लेखोरांनी चाकूने पाच ते सहा वार केले. खडका रोडवरील एका पुलाजवळ रात्रीच्या 10.30 वाजेच्या सुमारास हा युवक जखमी अवस्थेत आढळल्याने त्यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेताना त्याचा मृत्यू झाला. हा खून नेमका कुणी वा कोणत्या उद्देशातून केला? हे अद्याप समजू शकले नाही हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

पोलिस तत्काळ घनास्थळी

खुनाची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठचे प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताच्या पोटावर आरोपींनी चार ते पाच वार करण्यात आल्याचे समजते तर मृतदेह शहरातील जामनेर रोडवरील एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आणल्यानंतर डॉ.राजेश मानवतकर यांनी संबंधित मयत झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. खून झाल्याच्या वृत्ताला पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी दुजोरा देत त्याच्या छातीवर वार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 

पंधरा दिवसापूर्वी ही तरुणाचा खून

भुसावळ मधील श्रीराम नगरात एका तरुणाचा घरात घुसून त्याच्यावर गोळीबार करून खून केल्याची घटना घडली होती. त्यामुळे भुसावळातील ही घटना ताजी असतांना आज पून्हा एका तरुणाचा खून झाल्याची घटना नागरिकांना माहिती पडल्याने नागरिकांमध्ये आता भितीचे वातावरण निर्णाण झाले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणांना आजपासून मिळणार १५०० रुपये; फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात!

Jaykumar Rawal Photo Viral : व्हॉट्सॲपवर फोटो फॉरवर्ड करताना शंभर वेळा विचार करा! पणनमंत्र्यांचा मॉर्फ फोटो व्हायरल, धुळ्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

SIP Investment: 1 एप्रिलपासून गुंतवणूक सुरू करायची? SIP ठरू शकते तुमची सर्वात मोठी गेमचेंजर! कशी ते समजून घ्या सोप्या शब्दांत

'तिचे केस किती आकर्षक...' प्रियकराकडून मैत्रिणीच्या केसांची स्तुती; प्रेयसी संतापली, संतापजनक घटनेनं मुंबई हादरली

Ashok Kharat Files: ''रुपाली चाकणकरच पीडितांना खरातकडे पाठवायच्या'', महिला नेत्याचे गंभीर आरोप, केली अटकेची मागणी

SCROLL FOR NEXT