3 13.jpg 
जळगाव

माझे पप्पा चालत गेले...परत आलेच नाही!; पितृछत्र हरपलेल्या मुलाचे अश्रू अनावर

सकाळवृत्तसेवा

जळगाव : वडिलांचा अहवाल "पॉझिटिव्ह' आल्यामुळे त्यांना जळगावातील कोविड रुग्णालयात दाखल केले. माझे पप्पा रुग्णालयात व्यवस्थित चालत गेले होते. परंतु याठिकाणी कोणीच वडिलांवर उपचार केले नाही. वडिलांना खाण्या-पिण्यापासून ते औषधी देखील मीच देऊन वडिलांची संपूर्ण काळजी घेतली होती. तेव्हा मला वाटले पप्पा पूर्णपणे बरे होऊनच आता घरी येतील... पण पप्पा परत आलेच नाहीत, अशी व्यथा सांगताना आपले पितृछत्र हरपल्याने मुलाचे अश्रू अनावर झाले होते. 

अमळनेरच्या गांधीपुरा भागातील सिद्धार्थ चौकातील प्रौढाचा अहवाल "पॉझिटिव्ह' आल्याने त्यांना 1 जूनला जळगाव शहरातील कोविड रुग्णालयात दाखल केले. काही दिवस आयसोलेशन वॉर्डात उपचार केल्यानंतर दोन- तीन दिवसानंतर त्यांना श्‍वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना "आयसीयू' दाखल केले. आपबिती कथन करताना तीस वर्षीय तरुण म्हणाला, वडिलांजवळ बसून त्यांची सेवा करीत होतो. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व कामे मलाच करावी लागत होती. वडिलांची सेवा करीत असतानाच त्यांचा अवघ्या सहा दिवसांत मृत्यू झाला. वडील "पॉझिटिव्ह' असल्याने सतत त्यांच्या संपर्कात येत असल्याने आता माझे संपूर्ण कुटुंबच "पॉझिटिव्ह' झाले. आई भाऊ आणि माझ्यावर अमळनेरात उपचार सुरू आहे. मात्र, जळगावातील जिल्हा कोविड रुग्णालयातील परिस्थिती अत्यंत वाईट असल्याची आपबिती पॉझिटिव्ह रुग्णाने कथन केली. 

लक्ष देण्याचे काम नातेवाइकांचे 
कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांना थेट आयसोलेशन वॉर्डात प्रवेश दिला जात आहे. अमळनेर येथील तरुण हा सकाळपासून वडिलांच्या संपर्कात राहत होता. या तरुणाने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे पीपीई किटची मागणी केली. मात्र, रुग्णाकडे लक्ष देण्याचे काम तुमचे असून, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या, असा सल्ला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून नातेवाइकांना दिला गेला. 

पप्पा आता तर ठीक होते... 
त्या तरुणाच्या वडिलांना "आयसीयू'त हलविल्यानंतर रुग्णावर लक्ष ठेवण्याच्या सूचना कक्षातील कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला दिल्या. वडिलांना चहा प्यायचा असल्याने हा तरुण वडिलांना चहा घेऊन आला. मुलाच्या हाताने चहा प्यायल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच त्याच्या वडिलांचे निधन झाले. वडील आतापर्यंत तर ठीक होते, कसे काय गेले, याचा जाब डॉक्‍टरांनाचा विचारला असता तुझ्या वडिलांचे फुफ्फुस खराब झाले असल्याचे सांगण्यात आले. 

बॉडी पॅक करायला केले जातेय प्रवृत्त 
उपचार सुरू असताना वडील मृत झाल्यानंतर दोन जण वडिलांची बॉडी पॅक करण्यासाठी आले. त्यातील एकाने आम्हाला बॉडी पॅक करायला मदत कर नाही तर दोन तासानंतर बॉडी पॅक होईल, अशी धमकी दिली. यावर या तरुणाने ते माझे वडील आहे आतापर्यंत मीच त्यांची सर्व सेवा केली. मला पीपीई किट द्या मीच त्यांची बॉडी पॅक करून त्यांना खांद्यावर घेऊन जातो, असे सांगितले. त्यावर त्या दोघा कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला पीपीई किट दिले आणि त्याला देखील बॉडी पॅक करण्यास प्रवृत्त केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Virgo Horoscope : कन्या राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मेहनतीचे फळ मिळणार; करिअरमध्ये मोठी उलथापालथ, घरी पैसा येणार

Leo Horoscope : सिंह राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): या आठवड्यात भाग्य तुमच्या पायाशी; धनलाभ योग, स्पर्धा परीक्षेत यश मिळणार

Cancer Horoscope : कर्क राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): सुरुवात कठीण, पण शेवट गाजणार; धनलाभ होईल अन् कामाच्या ठिकाणी मोठी कलाटणी

Gemini Horoscope : मिथुन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): तुमचे निर्णय ठरणार गेमचेंजर; प्रेम, करिअर, पैसा सगळं एकदम हाताला लागणार

SCROLL FOR NEXT