corona posi
corona posi 
जळगाव

चिंता वाढतेय...जिल्ह्यात नवीन चोवीस कोरोना बाधित 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. संसर्ग वाढण्याचा आलेख वरती चढत जात असून, यात आणखी 24 जणांची भर पडली आहे. यामुळे जिह्यातील बाधितांचा आकडा 595 वर पोहचला असून, सायंकाळपर्यंत हा आकडा सहाशेच्यावर जाण्याची शक्‍यता अधिक आहे. 

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा वाढता आलेख खाली येण्याचे नाव घेत नाही. यात आज रावेर, सावदा, भुसावळ, जळगाव, फैजपूर, धरणगाव, चाळीसगाव, चोपडा येथील 196 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 172 अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर 24 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्हा वासियांची चिंता आणखी वाढत चालली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये चोपडा, चाळीसगाव, फैजपूर, धरणगाव, शिरपूर, बोरकुल येथील प्रत्येकी एका व्यक्तींचा, जळगावातील आठ, भुसावळच्या चार, सावदा दोन, पावरा येथील चार रूग्णांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. 

सहाशे पार 
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 595 इतकी झाली आहे. दोन दिवसांपुर्वी पाचशे आकडा पार करणाऱ्या जळगाव जिल्ह्यात दोनच दिवसात शंभर बाधितांची वाढ झाली. यामुळे आकडा सहाशेच्या पार होण्याच्या मार्गावर आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT