farmer loan farmer loan
जळगाव

शेतकरी पीककर्जासाठी झिजविताहेत उंबरठे

शेतकरी पीककर्जासाठी झिजविताहेत उंबरठे

सकाळ डिजिटल टीम

तरवाडे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव शहरातील काही राष्ट्रीयीकृत बँकांच्या (Bank) ग्राहकांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या बँकांमध्ये पैसे भरणे व काढणे याव्यतिरिक्त दुसरे कोणत्याही प्रकारचे काम होत नसल्याने शेतकऱ्यांना (Farmer) याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. (Farmers go round the banks for crop loans)

सध्या शेतीची कामे, रासायनिक खते, बियाणे व इतर कामासाठी पैशांची नितांत गरज भासते. मात्र, संबंधित राष्ट्रीयीकृत बँकांकडून बहाळ, तरवाडे, भोरस यांसारख्या अनेक गावांतील शेतकऱ्यांना पीककर्ज नियमित भरूनही नवीन कर्ज वेळेवर मिळत नाही. बँकेत आल्यावर कर्मचारी नाही, आम्ही दोनच कर्मचारी आहोत, कॅश काउंटर सांभाळावे की कर्जप्रकरणे बघावीत, अशी उत्तरे दिली जातात.

शेतकऱ्यांपुढे प्रश्‍न

अक्षयतृतीया व रमजान ईद सण असल्‍याने ‘कोरोना’मुळे सर्व आर्थिक आवक बंद असल्याने सोने तारणसुद्धा सध्या होऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांत जास्त त्रास शेतकऱ्यांनाच होत आहे. मागील हंगामाचे घेतलेले पीककर्ज भरून हातचा पैसाही निघून गेला व नवीन पीककर्जही मिळेना. शेती कशी तयार करावी, असा प्रश्न पडला.

बँकेत कर्मचारीही कमीच

संबंधित बँकेत प्रत्यक्षात दोनच कर्मचारी असून, एक पद रिक्त, तर दोन कर्मचारी रजेवर असल्याची माहिती मिळाली. होणाऱ्या अडचणीबाबत शाखा व्यवस्थापकांना विचारणा केली असता या शाखेतील एकूण सात कर्मचाऱ्यांपैकी फक्त तीनच कर्मचारी काम करत असल्याने काही प्रमाणात तर अडचणी येणारच आहेत. शक्य तेवढ्या ग्राहकांना सुविधा देत आहोत, असे सांगण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन येथे कमी असलेल्या ठिकाणी कर्मचारी द्यावेत व होणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विषारी दारुकांडातील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत, महापालिकेत नोकरीबाबत सकारात्मक निर्णय घेणार

Rajat Patidar: Dhoni रोहितची बरोबरी? फायनलपूर्वी RCB कर्णधार रजत पाटीदारने मनातील गोष्ट सांगितली म्हणाला मी कधी विचार..

Gemini Omni ने बदलली व्हिडिओ एडिटिंगची दुनिया; AI वापरुन मिनिटात बनवा हवा तसा व्हिडिओ, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

US-Iran Deal : अमेरिका-इराण अंतिम करार पुन्हा खोळंबला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'या' २ नव्या मागण्यांनी वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT