girish mahajan girish mahajan
जळगाव

गिरीश महाजनांवर लागले दहा लाखाचे बक्षीस

गिरीश महाजनांवर लागले दहा लाखाचे बक्षीस

सकाळ डिजिटल टीम

जामनेर (जळगाव) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी हातात कागदी बॅनर झळकवून ‘जामनेरचे आमदार गिरीश महाजन दाखवा आणि दहा लाख रुपये बक्षीस मिळवा’, असे उपरोधिक आवाहन जनतेला केल्याने या अभिनव आंदोलनाचीच चर्चा दिवसभर शहरात होती.

पश्‍चिम बंगालमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे पदाधिकारी म्‍हणून महाजन हे गेल्‍या पंधरा-वीस दिवसांपासून पश्‍चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारासाठी गेले आहेत आणि हा विषय ते गेल्या दिवसापासूनच सर्वश्रृत झालेला आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने आमदारांवर टीकेची झोड उठवून दिली.

आठवडाभरापुर्वीही आरोप

आठवडाभरापूर्वी संजय गरुड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही आमदार महाजन अशा भयंकर कोरोना काळात जनतेला वाऱ्यावर सोडून मतदारसंघातून गायब झाले, असा आरोप केला होता. आता पुन्हा राष्ट्रवादीच्याच काही पदाधिकाऱ्यांनी विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील राजमाता जिजाऊ चौकामध्ये आंदोलन केले. या वेळी संदीप हिवाळे, विनोद माळी, शहराध्यक्ष जितेश पाटील आदी पदाधिकारी होते.

आरोग्‍यदूतांना जनतेची काळजी नाही का?

राज्यभरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी प्रत्येक आमदार, खासदार आपापल्या मतदारसंघामध्ये जनतेची आवश्यक ती मदत करण्यात गुंतलेले असताना येथील आरोग्यदूत म्हणविणारे माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन मात्र बंगालमध्ये प्रचार करण्यात मग्न आहेत. त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडून पक्षहित जास्त जोपासल्याचे दिसते, असाही टोमणा या वेळी किशोर पाटील यांनी आंदोलनादरम्यान लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT