Mla Anil patil
Mla Anil patil sakal
जळगाव

निम- मांजरोद पुलाला तापी पाटबंधारेचा ठेंगा

सकाळ डिजिटल टीम

कळमसरे (जळगाव) : अमळनेर तालुक्यातील जिव्हाळ्याचा व दळणवळणाच्या दृष्टीने महत्‍त्वाचा असलेला निम्न तापी प्रकल्पावर, जलसिंचन विभागाकडे आधारीत असलेला हा निम- मांजरोद पुल शासनाच्या मागील काळात मंजूर झाला होता. मात्र पुरेशा निधीअभावी हा पूल तापी पाटबंधारे महामंडळाने (Tapi Irrigation Corporation department jalgaon) कायमचा रद्द केला आहे. तापी नदीवरील नियोजित निम- मांजरोद पुल बांधन्यात यावा यासाठी आमदार अनिल पाटील (NCP mla anil patil) यांना निवेदन देण्यात आले. (jalgaon-nim-manjrod-bridge-tapi-river-cancel-no-fund)

तापी नदीवर पूल झाल्यास या मार्गाने शिरपूर- सेंधवा- इंदोर या भागात जाण्यासाठी सोयीस्कर होणार आहे. पुल व्हावा ही अनेक वर्षांपासूनची तालुक्यातील नागरीकांची मागणी आहे. हा पुल झाल्यास तालुक्यातील दळणवळनाच्या सोयी वाढणार आहेत.

मंजूर पुल निधीअभावी रद्द

तापी पाटबंधारे महामंडळ अंतर्गत निम- मांजरोद पुलाला मंजूरी मिळाली होती. या अंतर्गत नीम ते मांजरोद अंतर्गत तापी नदीत मागील काळात अधिकाऱ्यांनी सर्वेही केला होता. यामुळे तालुक्यातील नागरिकांनी पुल होणार म्हणून समाधान व्यक्त केले होते. या पुलाच्या कामामुळे जळगाव धुळे, शिरपुर ते मध्यप्रदेश जाण्यासाठी मोठी सोय होणार असून अमळनेर तालुक्यात यामुळे दळण वळणाच्‍या सोयी वाढणार आहेत. मात्र सद्यस्थितीत तापी पाटबंधारे महामंडळाने पुरेशा निधीअभावी हा पुल कायमचा रद्द करण्यात आल्याने तालुक्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बांधकाम विभागाकडून मंजूर करण्याची मागणी

निम- मांजरोद पुल तापी पाटबंधारे महामंडळ अंतर्गत न करता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करण्यात यावा; त्यासाठी ठोस निधीची तरतूद करून कामाची सुरुवात करून जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवावा. यासाठी आमदार अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी कपिलेश्वर संस्थानचे सचिव मगन पाटील, संदीप घोरपडे, भागवत पाटील, प्रा अशोक पवार, धार येथील गणेश पाटील, अलीम मुजावर, मारवड येथील उमाकांत पाटील भागवत, एस. एम. पाटील, आर. पी. चौधरी, तुकाराम पाटील, छोटु पाटील, अॅड. राजेंद्र चौधरी, सुदाम पाटील आदी उपस्थित होते. या निवेदनावर नीम, मारवड, कळमसरे, पाडळसरे, गोवर्धन -बोरगांव, धार, बोरगांव, पाडळसरे, मांजरोद, शहापुर, तांदळी, आदी गावातील लोकप्रतिनिधीसह ग्रामस्थानी सह्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

शासनाकडे पाठपुरावा करून रस्त्याला राज्य मार्गाचा दर्जा मिळवून पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचा या पंचवार्षीकमध्ये उदिष्ट आहे.

– अनिल पाटील, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT