no sunshine 
जळगाव

सलग दोन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : शहरासह जिल्ह्यात शनिवारी (ता. १२)पासून ढगाळ वातावरण व पावसामुळे सूर्यदर्शन झालेले नाही. असे वातावरण पिकांवरील रोगराईला आमंत्रण देते. सोबतच नागरिकांनाही व्याधी होत आहेत. ढगाळ वातावरण शक्य होईल तेवढ्या लवकर निवळण्याची गरज आहे. ज्वारी, हरभरा, गव्हाला वातावरण पोषक असले तरी कांदा, दादरला मारक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गेल्या चोवीस तासांत फक्त अडीच मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाळ्यात १२२ टक्के पाऊस झाला आहे. 
जिल्ह्यात १६ डिसेंबरपर्यंत बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे. त्याप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व पाऊस सुरू झाला आहे. शनिवारी तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत चक्क पावसाळ्यासारखा पाऊस पडत होता. रविवारी (ता. १३) सकाळीही काही ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू होती. 
 
पिकांना फायदा, मात्र..
गारठा व पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी तीन- चार दिवसांनंतर असे वातावरण पिकांसाठी धोकादायक असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. रविवार सुटीचा दिवस होता. गारठ्यामुळे सर्वांनीच स्वेटर, मफलर घातलेले होते. काहींनी या वातावरणाची संधी साधत घरीच चहा, भजीचा आस्वाद घेतला. काहींनी आपल्या मित्रांना घरी बोलवून चहा, भजीचा पाहुणचार केला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike: दसरा-दिवाळीआधीच दूध महागणार? तब्बल 8 रुपयांची वाढ! सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम

Asian Games 2026: मुंबईच्या पोरीची जपानमध्ये हवा! Quimcy Dsouza ऐतिहासिक पदक जिंकण्याच्या उंबरठ्यावर; ती खेळते, तो Teqball नक्की आहे तरी काय?

शेतकरी दुष्काळाने होरपळतोय, नेते खातायत सुकामेवा, आढावा बैठकीत काजू बदामचा नाश्ता

IIT Bombay ChatGPT Incident : IIT बॉम्बे विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर अधिकृत खुलासा; शिस्तभंगाची कारवाई केली होती का? संस्थेने सांगितलं सत्य

प्रसूतीनंतर ५० दिवस मृत्यूशी झुंज, स्तनदा मातेला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न; उपचारानंतर मिळालं जीवनदान!

SCROLL FOR NEXT