north maharashtra university north maharashtra university
जळगाव

‘उमवि’चा अर्थसंकल्प; नंदुरबारच्या आदिवासी अकादमीसाठी कोटीची तरतूद

‘उमवि’चा अर्थसंकल्प; नंदुरबारच्या आदिवासी अकादमीसाठी कोटीची तरतूद

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : नंदुरबार येथील आदिवासी अकादमींतर्गत नावीन्यपूर्ण प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात एक कोटी पाच लाख रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अधिसभेने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पाचे हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. (jalgaon-north-maharashtra-university-budget-funding-aadivasi-akadami)

विद्यापीठात शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण व आदिवासी भागातील असून, ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने उच्च शिक्षणाचा प्रचार व प्रसार या बाबींचा विचार अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.

आदिवासी अकादमी उपक्रम

आदिवासी अकादमी उपक्रमात आंतरशाखीय विद्यावाचस्पती विद्यार्थ्यांकडून आदिवासी ग्रामीण भागातील उपक्रमांसाठी विविध संशोधन प्रकल्प राबविले जाणार आहेत. सहयोगी सहकारी शिक्षण सहाय्य योजनेंतर्गत संशोधन करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव यावा, म्हणून ही योजना राबविण्यात येणार असून, त्यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

संशोधनासाठी ५० लाख

आंतरविद्याशाखीय संशोधन प्रकल्प ही नवीन योजना राबविण्यासाठी ५० लाख रुपयांची, विद्यापीठ प्रशाळा केंद्र व उपकेंद्रासाठी १३ कोटी ४९ लाख, परीक्षा व मूल्यमापन विभागासाठी २६ कोटी ८२ लाख, विद्यार्थी कल्याण विभागासाठी सहा कोटी २५ लाखांची तरतूद असून, यात ‘कमवा व शिका योजना’, युवारंग, दत्तक योजना, विद्याधन योजना आदी ३७ योजनांचा समावेश आहे. क्रीडांतर्गत १३ योजनांसाठी एक कोटी ५५ लाख, विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृहासाठी ४० लाख, ज्ञानस्रोत केंद्रासाठी २६ लाख, आरोग्य केंद्रासाठी २१ लाख, बहिणाबाई अध्यासन भवनासाठी १.५० कोटींची तरतूद केली आहे.

बहिणाबाई गौरव पुरस्कार

शिक्षण, आरोग्य, साहित्य अशा विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करणाऱ्या शैक्षणिक अथवा अशैक्षणिक पात्रताधारक असलेल्या मान्यवरांचा अहवाल प्रस्ताव मागवून त्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कार २०२१-२२ पासून देण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिन अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याचे विद्यापीठाने ठरविले आहे.

चर्चेत यांचा सहभाग

अर्थसंकल्पावरील चर्चेत प्रा. गौतम कुवर, प्राचार्य आर. एस. पाटील, प्राचार्य ए. टी. पाटील, प्राचार्य लता मोरे, जी. वाय. पाटील, दिनेश नाईक, प्राचार्य अशोक राणे, प्राचार्य पी. पी. छाजेड, दिनेश खरात, प्राचार्य अशोक खैरनार, सुरेश पवार, प्राचार्य अनिल लोहार, डॉ. प्रशांत सरोदे, अमोल मराठे, डी. पी. नाथे, प्रा. एस. आर. चौधरी, नितीन ठाकूर, मनीषा खडके, प्रा. एकनाथ नेहेते, प्रा. सुनील गोसावी तसेच विष्णू भंगाळे यांनी भाग घेतला. प्रा. गौतम कुवर, विष्णू भंगाळे व नितीन ठाकूर यांनी काही सूचना अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने केल्या. सदस्यांच्या शंकांचे प्रभारी वित्त व लेखाधिकारी एस. आर. गोहिल यांनी निरसन केले. बैठकीस प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार उपस्थित होते. सदस्य सचिव तथा प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

प्रश्‍नोत्तराचा तास तहकूब

विषयपत्रिकेतील लेखापरीक्षण अहवालाच्या अनुषंगाने प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी समिती नियुक्त करून आक्षेपांची पूर्तता करून अधिसभेसमोर हा अहवाल पुन्हा मांडला जाईल, असे सांगितले. त्यानंतर प्रश्नोत्तरांचा तास तहकूब करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT