जळगाव

घरकुल घोटाळा : अपात्रता प्रकरणी न्यायालयाची पाच  नगरसेवकांसह आयुक्तांना नोटीस 

देविदास वाणी

जळगाव ः येथील बहुचर्चीत घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेल्या विद्यमान पाच नगरसेवकांना अपात्र करण्यासंदर्भात १६ मार्च २०२० रोजी न्यायालयात विशेष दावा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने आज पाचही नगरसेवकांसह महापालिका आयुक्तांनाही नोटीस बजावत आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी दावा दाखल केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता हे पाठपुरावा करत आहेत. 

घरकुल घोटाळ्यात आजी-माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांसह ४८ जणांना धुळे विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यामध्ये नगरसेवक भगत बालाणी, नगरसेवक सदाशिव ढेकळे, नगरसेवक दत्तात्रय कोळी, नगरसेवक लता भोईटे, नगरसेवक कैलास सोनवणे यांचा समावेश आहे. दरम्यान, पाचही नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी मंत्रायलयात राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांच्याकडे एका तक्रारीद्वारे केली होती. 


डिसेंबर २०१९ मध्ये दोषी पाचही नगरसेवकांना अपात्र का करण्यात येवू?, हा जाब विचारत महापालिका आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. १७ डिसेंबर रोजी सर्व नगरसेवकांना सुनावणीसाठी हजर राहण्याचेही आदेश दिले होते. त्यानंतर याप्रकरणात आपल्याला कारवाईचा अधिकार नसल्याचे आयुक्तांनी म्हटले होते. 

पाच दिवसांनी पून्हा होणार सुनावणी

आज न्यायाधिश जे.जी. पवार यांच्या कोर्टात सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टाने याप्रकरणी आज न्यायालयाने पाचही नगरसेवकांना नोटीस बजावत आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पाच दिवसांनी पुन्हा सुनावणी होणार आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde News : भाजप अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच नितीन नवीन यांचा निर्णय; विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी!

Bajaj Pune Grand Tour : २१ आणि २३ जानेवारीला वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

JEE Main 2026 : पुण्यात वाहतूक बदलामुळे जेईई मेन परीक्षार्थींना केंद्रावर पोचण्यासाठी आव्हान

Toll Tax New Rules : आता 'या' वाहनांना 'फिटनेस सर्टिफिकेट' अन् 'एनओसी'ही मिळणार नाही!

Pune Cycle Race: पुण्यातल्या सायकल स्पर्धेबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय; स्पर्धकांच्या दिमतीला दोन विशेष पथके

SCROLL FOR NEXT