जळगाव

कोविड कक्ष, क्वारंटाईन सेंटरमध्ये पोलीसांचा राहणार आता कडक बंदोबस्त 

देविदास वाणी

जळगाव : जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर, संस्थात्मक अलगीकरण केंद्रात २४ तास पोलिस बंदोबस्त, होमगार्ड नियुक्ती करण्याचे व सी.सी.टी.व्ही.बसविण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज काढले आहेत. पाचोऱ्याच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये एका रुग्णांने आत्महत्या केली होती, अमळनेर येथील एक रूग्ण न सांगता निघून गेला हेाता. याघटनांच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत. 


कोविड केअर सेंटर, संस्थात्मक अलगीकरण केंद्रात जाण्यायेण्यासाठी एकच प्रवेशद्वार असेल, केंद्राचे कपाउंड बंदिस्त असावे, खिडक्यांना ग्रील, जाळी असावी. 
या केंद्रात अनावश्यक व्यक्तींना प्रवेश दिला जाऊ नये. नियुक्ती अधिकारी, कर्मचारी यांनी ओळखपत्र दाखवूनच प्रवेश घ्यावा. महिला विभागात आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष दक्षता घ्यावी. या सेंटरला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित भेटी द्याव्यात, त्यात आढळलेल्या उणिवा, समस्या तात्काळ दूर कराव्यात, या केंद्रात नियुक्त केलेले नोडल अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, पोलिस अधिकारी, पोलिस स्टेशनचे फोन नंबर दर्शनी भागात लावावेत. समाजसेवी संस्था, पदाधिकारी यांच्या भेटीवेळी नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी उपस्थित राहवे असे आदेश देण्यात आले आहेत. 

कोविड संशयित व बाधीत रुग्ण यांची सरमिसळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. मास्क लावणे, सॅनिटाझरचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या आदेश पोलिस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक, ‘डीन’ यांना देण्यात आले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT