जळगाव

जळगाव जिल्ह्यात कोरोना ग्रस्तांची संख्या दीड लाखावर जाणार

चेतन चौधरी

भुसावळ : जिल्ह्यात कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत असून, ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही संख्या एक ते दीड लाख पर्यंत जाऊ शकते, असे मत जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप पटोडे यांनी व्यक्त केले आहे. या संसर्गावर उपाय म्हणून लस येणार आहे. मात्र ही लस कधी येईल ते अद्याप सांगता येणार नाही. त्यामुळे कोरोना रोखण्याची जबाबदारी ही सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आवारात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी प्रमोद पांढरे, गटविकास अधिकारी विलास भाटकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, मावळते सरपंच रामलाल बडगुजर, परिसरातील उपशिक्षक, आशा सेविका आदी उपस्थित होते.

80 टक्के लोकांना कोरोना
80 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला आहे. प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे या संसर्गाचा त्यांना त्रास जाणवला नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. या आजाराची लागण 8 ,9 , 10 दिवसांमध्ये जास्त जाणवते. सध्या सर्वत्र नागरिक जबाबदारीने वागत नसल्यामुळे त्यानी नाराजी व्यक्त केली. कुठेही जा विना माक्स, सोशल डिस्टनचा फज्जा उडाल्याचे त्यांच्या अनुभवातून दिसून आले. ही सर्व जबाबदारी सामाजिक जबाबदारी असून सर्वांनी स्वीकारली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

मुले झाली 'सैराट' 
सध्या सर्वत्र तरुण मुले सैराट झाली आहे. वाटेल त्या ठिकाणी विनामास्क, समूहाने बसलेली दिसत आहे. आई-वडील मात्र यांना रोखत नाही. या तरुण मुलांपासूनच घरात कोरोना येत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तरुण मुलांची प्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळे त्यांना अगोदर हा त्रास जाणवत नाही . मात्र घरातील वयस्कर माणसांना त्याचा त्रास जाणवतो. त्यामुळे पालकांनी मुलांवर बंधने घालावी, असे आवाहन त्यांनी केले.


कुऱ्हे पानाचे ग्रामीण हॉटस्पॉट
तालुक्यात कोरोनाने वरणगाव पाठोपाठ खडका, कंडारी, साकरी, वेल्हाळा, मोंढाळा यासह बऱ्याच गावांमध्ये शिरकाव केला होता. कुऱ्हे ( पानाचे ) गाव मात्र यापासून दूर होते. ग्रामस्थांनी सुरुवातीला खूप काळजी घेतली,सर्वांनीच संसर्गापासून दूर होत असल्याचे दिसून येत. मात्र गेल्या काही दिवसात वाढत असलेली कोरोणाची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून काळजी घ्यावी व कोरोनाला रोखावे , असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांनी केले. सध्या कुऱ्हे ( पानाचे ) येथे रुग्ण संख्या पन्नास पर्यंत पोहोचली असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मी ग्रामस्थांच्या संपर्कात नेहमी आहे . काही अडचण असल्यास मला सांगा. मात्र सर्वांनी कोरोना रोखण्यासाठी पुढे , या असे आवाहन त्यांनी केले आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT