जळगाव

धान्य खरेदीचा मार्ग सुकर... धान्य खरेदीसाठी दीड लाख बारदान 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः जिल्ह्यात "लॉकडाउन'मुळे शेतकऱ्यांकडील भरड धान्य खरेदीसाठी रिकाम्या बारदानाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या कल्पकतेने आजअखेर एक लाख 45 हजार 664 रिकामे बारदान जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाले आहेत. यामुळे बारदानाचा प्रश्‍न सुटला आहे. आतापर्यंत 40 हजार क्विंटल मका, तर तीन हजार 494 क्विंटल ज्वारी खरेदी झाली करण्यात आली आहे. 

गेल्या महिन्यात कपाशीसोबतच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे ज्वारी, मका खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. मात्र, बारदानाअभावी ती बंद पडली. जिल्हा मार्केटिंग अधिकारी परिमळ साळुंखे यांनी खरेदीसाठी रिकाम्या बारदानाचा मोठा प्रश्‍न असल्याचे सांगितले होते. बारदान खरेदीसाठी दिल्लीत संपर्क साधून पत्रव्यवहार करावा लागणार होता. त्यासाठी किमान पंधरा ते वीस दिवस गेले असते. दरम्यानच्या काळात ज्वारी, मका खरेदी ठप्प होणार होती. तोपर्यंत पावसाळा सुरू असता. यामुळे तातडीने बारदान उपलब्ध करून देणे गरजेचे होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना रिकामे बारदान तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगून त्यांना त्याचा मोबदला दिला जाईल, असे सांगितले होते. जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी याकामी पुढाकार घेत सर्व स्वस्त धान्य दुकानदारांकडून बारदान जमा करून दिले. आतापर्यंत एक लाख 45 हजार 664 रिकामे बारदान उपलब्ध झाले. ते जिल्ह्यातील 16 खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदणीच्या प्रमाणात वाटप करण्यात आले. यामुळे धान्य खरेदीचा मार्ग सुकर झाला आहे. 


वजनकाटेही वाढविले 
जिल्ह्यात 16 ठिकाणी धान्य खरेदी केंद्रे असून, तेथे 30 जूनपर्यंत धान्य खरेदी सुरू राहील. तोपर्यंत शेतकऱ्यांकडील सर्व धान्याची खरेदी झाली पाहिजे, या हेतूने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी प्रत्येक खरेदी केंद्रावर दोन-तीन वजनकाटे वाढवून दिले. यामुळे धान्य खरेदी वेगात सुरू झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Pali Stray Dogs: पालीत भटक्या कुत्र्यांचा कहर; १० वर्षांच्या चिमुरडीसह भाविक महिलेला चावा

SCROLL FOR NEXT