जळगाव

प्लाझ्मा ठरू शकते कोरोनावरील सर्वांत मोठे औषध 

राजेश सोनवणे

जळगाव: प्लाझ्मा कोरोनावर सर्वांत मोठे औषध होऊ शकते. प्लाझ्मादानासाठी कोरोनामधून बरे झालेल्यांनी पुढे यावे. स्वतःचे आरोग्य स्वतःच्या हाती हे लक्षात घेऊन वेळोवेळी तपासण्या करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. 


श्री जैन युवा फाउंडेशन, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे जागतिक शाकाहार दिनानिमित्त दर वर्षी शाकाहार रॅली काढण्यात येते. यंदा कोरोनामुळे रॅलीऐवजी प्लाझ्मादान शिबिर घेण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. मंचावर रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी, श्री जैन युवा फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश ललवाणी, सचिव रितेश पगरिया, कोशाध्यक्ष अमोल फुलफगर मंचावर उपस्थित होते. प्लाझ्मा दान करणाऱ्या सचिन बरडिया व योगेश पाटील या दोघांचा प्रातिनिधिक सत्कार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. 


जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, की कोरोनाच नव्हे तर अनेक दुर्धर आजारांत विविध तपासण्या करून घेतल्या पाहिजेत. तरुणांनीदेखील यासाठी पुढाकार घेऊन चाचण्या करून योग्य वेळी निदान करून घ्यावे, असेही आवाहन त्यांनी केले. यासाठी जनजागृती महत्त्वाची असून, सामाजिक संस्थांचे योगदान व पुढाकार महत्त्वाचा आहे. आपल्या जीवनशैलीविषयी विचार करावा लागेल. स्वतःच्या हाती स्वतःचे आरोग्य असून, दक्ष जरी राहिले तरी आजार दूर ठेवता येतात, असेही ते म्हणाले. 

५५ जणांनी केले प्लाझ्मादान 
प्लाझ्मादान महाशिबिरात एकूण ५५ जणांनी प्लाझ्मा दान केले. रितेश पगारिया यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी श्री जैन युवा फाउंडेशनचे उपाध्यक्ष आनंद चांदीवाल, कार्याध्यक्ष पीयूष संघवी, सहसचिव पारस कुचेरिया, सहकोशाध्यक्ष प्रतीक कावडिया, जनसंपर्क अधिकारी प्रवीण छाजेड, कार्यकारिणी सदस्य मनोज लोढा, प्रवीण पगारिया, सचिन राका, रिकेश गांधी, प्रीतेश चोरडिया, अनिष चांदीवाल, चंद्रशेखर राका आदींचे सहकार्य लाभले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: पर्यटकांचा हिरमोड! देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हिणी घाट बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

Pune Property Tax : पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली: पहिल्या तिमाहीत १३९५ कोटी, गेल्या वर्षीपेक्षा १०२ कोटींची वाढ

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

SCROLL FOR NEXT