Sand 
जळगाव

अवैध वाळूचोरी नियंत्रणासाठी महसूलसह पोलिसांची पथके

वाळूचे ठेके बंद असताना वाळूमाफिया नदीत पाणी असतानाही वाळूचा उपसा करून चोरी करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः नदीपात्रातील अवैध वाळूचा (Sand) उपसा रोखण्यासाठी महसूल पथकासोबत (Revenue Squad) पाचही पोलिस ठाण्यांचे कर्मचारी तैनात करून पोलिस निरीक्षक (Police) व तहसीलदारांनी सर्वच नदीपात्रांवर एकाच वेळी छापे टाकायचे असा निर्णय मंगळवारी (ता. २६) येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तहसीलदार व शहरासह तालुक्यातील पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांची मंगळवारी बैठक झाली. अवैध वाळूउपशाबाबत ‘सकाळ’ने वारंवार वृत्त प्रसिद्ध करत हा गंभीर मुद्दा समोर आणला होता.


गिरणा नदीपात्रातून बांभोरी, सावखेडासह विविध ठिकाणांवरून अवैधरीत्या वाळूचा उपसा होत आहे. वाळूचे ठेके बंद असताना वाळूमाफिया नदीत पाणी असतानाही वाळूचा उपसा करून चोरी करीत आहेत. ते रोखण्यासाठी तहसीलदार नामदेव पाटील यांनी जळगाव तालुक्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांची बैठक बोलविली. त्यात अवैधरीत्या वाळू उपसा रोखण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम ठरविण्यात आला. अवैधरीत्या वाळू उपशाविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई तीव्र करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नदीपात्रातून ज्या ठिकाणावरून वाळूचोरी होते त्या ठिकाणच्या मार्गावर तीन ते पाच फूट खोलीचे चर खोदण्यात आले, सोबत ते रस्ते बॅरिकेड्स लावून बंदही करण्यात आले आहेत.

सातही पोलिस ठाण्यांनी महसूलच्या दोन पथकांसोबत पाच-पाच पोलिसांचा बंदोबस्त द्यावा, ही पथके रोज वेळी-अवेळी वाळू मार्गावर गस्त घालतील व अवैधरीत्या होणारा वाळू उपसा रोखेल असे ठरविण्यात आले. दर आठवड्याला पथकातील पोलिस कर्मचारी नवीन असतील.
सावखेडा, गिरणा पंपिंग, बांभोरी, नागझिरी, वैजनाथ आदी ठिकाणे वाळूउपशाची आहेत. या मार्गावर गस्त वाढवून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जळगाव शहराचे पोलिस निरीक्षक व्ही. एन. ठाकूरवाड, एमआयडीसी पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, रामानंद पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे, जिल्हा पेठ पोलिस निरीक्षक रामदास वाकोड, उपनिरीक्षक प्रदीप चांदसेकर, नशिराबादचे उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके, शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक बळिराम हिरे, जळगाव तालुका पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आदी उपस्थित होते.


आता गुजरात पावत्यांचे गूढ
अवैधरीत्या वाळूउपशा करणाऱ्यांकडे गुजरातच्या पावत्या आढळून आल्या आहेत. यामुळे या पावत्यांचे गूढ अधिकच वाढले आहे. पावसाळ्यानंतर नदीपात्रात अजूनही पाणी आहे. नदीतून वाळूच्या उपशाला पर्यावरण समिती नकार देते आहे. दुसरीकडे वाळूमाफिया अवैधरीत्या नदीपात्रातून वाळूउपसा करतात. त्यांच्याकडे गुजरातच्या वाळूउपशाच्या पावत्या आढळतात. वाळूमाफियांकडे गुजरातच्या पावत्या येतातच कशा, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT