Police Inspector Dhananjay Mahadev Yerule
Police Inspector Dhananjay Mahadev Yerule 
जळगाव

वय ५५ वर्ष..आणि चोविस तासात गाठला चारशे किलो मिटरचा पल्ला

रईस शेख

गेल्या चार वर्षापासून सायकल रायडींगचा छंद त्यांना जडला असून नियमित सायकलींग करत असतांना अनेक लहान मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला.



जळगाव ः औरंगाबाद येथे १४ व १५ ऑगस्ट या दोन दिवशी पॅरिस येथील ऑडिक्स या कंपनीतर्फे `ऑडिक्स इंडिया`(Audix India) या नावाने सायकल रायडिंग स्पर्धेचे (Bicycle riding competition)आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यभरातील सायकल रायडर्स सहभागी झाले होते. यात जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय महादेव येरुळे (Police Inspector Dhananjay Mahadev Yerule) यांनी २४ तास ४० मिनिटात ४०० किलोमीटरचा पल्ला गाठला.


मुळ लातूर येथील रहिवासी पंचावन्न वर्षीय पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे गेल्या दीड वर्षापासून जिल्‍हा पोलिस दलात कार्यरत असून संवेदनशील अशा शहर पोलीस ठाण्याचा पदभार त्यांच्याकडे आहे. निरोगी राहण्यासाठी गेल्या चार वर्षापासून सायकल रायडींगचा छंद त्यांना जडला असून नियमित सायकलींग करत असतांना अनेक लहान मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. सोबतचे अधीकारी आणि कर्मचाऱ्यांना सायकलींग अथवा कुठल्याही खेळासाठी वेळ काढण्याबाबत उद्दुक्त करुन आरोग्याच्या काळजीबाबत जागृती करत असतात.

औरंगाबाद येथील स्पर्धेत सहभाग

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन औरंगाबाद येथील ऑडिस्क इंडिया या सायकल रायडिंग स्पर्धेची माहिती मिळाली. त्यात धनंजय येरुळे हे ४०० किलोमीटर साठी सहभागी झाले. ठरल्या प्रमाणे २७ तासात ही स्पर्धा त्यांना पूर्ण करावयाची होती. १४ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथील क्रांती चौकातून सकाळी ६ वाजता सुरुवात झाली. औरंगाबाद, ते देवगड फटा, तेथून पुन्हा औरंगाबाद ते मांजरसोफा पुन्हा क्रांती चौकात परत अशी स्पर्धा झाली. येरुळे यांनी २४ तास ४० मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली. स्पर्धेची माहिती पॅरिस येथे जाणार असून ते मुल्यांकनानंतर प्रमाणपत्र व मेडल दिली जाणार असल्याचे पोलीस निरिक्षक धनंजय येरुळे यांनी सकाळ शी बोलतांना सांगितले.

सायकलींगने दिली उर्जा
पोलिस खात्यातील ताण-तणावातून नैराश्य आणि थकवा येण स्वाभावीक आहे पण, खेळाचा छंद असेल तर व्यक्ती आशावादी होते. वयाची पन्नाशी गाठल्यावर छंदातूनच सायकलींगकडे वळलो. रात्रपाळीची ड्यूटी, कायदा व सुव्यवस्थेची परीस्थीती हाताळून अपवाद वगळता दररोज ३०-४० किलोमिटर सायकलींगचा सराव आणि व्यायाम होतो. सायलींगमुळे शरीरात उर्जा, उत्साह संचारतो सोबतचा आंनदी राहण्यास मदत ही मिळते.
- धनंजय येरुळे
वरीष्ठ निरीक्षक, शहर पोलिस ठाणे जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT