professor patent 
जळगाव

कडू औषधही होणार गोड 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बऱ्याचदा औषध कडवट असल्याने मुले नाक मुरडतात, वृद्ध माणसांनाही असे औषध घेणे त्रासदायक ठरते. मात्र, आता कडवट औषधांची चव बदलता येणार आहे. यासंदर्भात जळगावचे प्रा. डॉ. जयेश पाटील यांनी संशोधन केले असून, त्यांच्या संशोधनाला बुधवारी (१६ सप्टेंबर) पेटंट मिळाले. 
श्री गुलाबराव देवकर बी फार्मसी महाविद्यालयातील प्रा. डॉ. जयेश पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संशोधनाचे कार्य करीत असताना सहकारी डॉ. उमाकांत वर्मा, प्रा. गोकुळ खैरनार, डॉ. विनोद मोकळे, मार्गदर्शक प्रा. डॉ. जे. बी. नाईक यांच्यासह संशोधन क्षेत्रात भरारी घेतली. त्यांनी २०१४ मध्ये औषधनिर्माणशास्त्रात ‘फास्ट रिलीज टेस्ट मास्क पावडर फॉर ओरल सस्पेंशन’ या विषयावर संशोधन करून भारतीय पेटंट विभागात फाइल केले. त्यानंतर गेली सहा वर्षे या विषयावर भारतीय पेटंट विभागाकडून बऱ्याच वेळा सुनावणी झाली. अखेर बुधवारी (१६ सप्टेंबर) त्यांच्या संशोधन कार्याला भारतीय पेटंट विभागाकडून पत्र प्राप्त झाले. या संशोधनकार्यात त्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे आर्थिक सहकार्य लाभले. 
या संशोधनास मान्यता मिळाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी डॉ. जयेश पाटील यांचे कौतुक केले व पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला. या वेळी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर विशाल देवकर, बी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश पवार तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील यांनीदेखील डॉ. जयेश पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी अतुल पाटील, प्रा. रोहित सावंत, ग्रंथपाल आर. सी. पाटील, राहुल पाटील व महाविद्यालयाचे कर्मचारी यांनी डॉ. जयेश पाटील यांचे अभिनंदन केले. 

काय आहे संशोधन... 
अतिप्रमाणात कडवट असलेले औषध मुले आणि वृद्ध माणसांना घेण्यास त्रासदायक ठरते. त्यामुळे अशा औषधाचे लायोफिलिझशन टेक्निक वापरून ड्राय नॅनो पार्टिकल्स बनविले व ते नॅनो पार्टिकल्स बिटा सायक्लोडेक्सट्रिन व पीव्हीपीके ३० या पॉलिमरसोबत फॉर्म्युलेशन करून ओरल सस्पेंशन तयार केले. या तंत्रज्ञानामुळे इतर सर्व कडवट औषधांची चव बदलता येऊ शकते. जेणेकरून त्यांच्या या संशोधनामुळे लहान मुले व वृद्ध माणसे या औषधाचा उपयोग सहज करू शकतात. या औषधाचे शरीरावर तत्काळ परिणाम होऊन आरोग्यसाठी हितकारक ठरणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT