जळगाव

जळगावचा रेल्वे मालधक्का शिरसोलीला स्थलांतरीत होणार 

सचिन जोशी


जळगाव  : रेल्वेस्थानक परिसरातील मालधक्का पाळधी येथे स्थलांतरित होणार होता. मात्र, केंद्र सरकारचा विषय असल्याने हा धक्का आता मतदारसंघात असणाऱ्या शिरसोली येथे लवकरच स्थलांतरित होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. 


जळगावच्या मालधक्क्यामुळे समस्या निर्माण झाल्या होत्या. येथे होणारी वाहतूक समस्या, पिंप्राळा रेल्वे गेटजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अपघातही होत होते. अनेकदा निष्पाप नागरिकांचे बळी जात होते. यातून शहरवासीयांची सुटका व्हावी, यासाठी हा रेल्वे धक्का पाळधीला स्थलांतरित करण्यात येणार होता. त्यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन दिल्लीत जाऊन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करून आले होते. त्या वेळी खासदार उन्मेष पाटील उपस्थित होते. चर्चेत मालधक्क्याला येणाऱ्या अडचणी व त्याबाबतचे पर्याय याविषयी चर्चा झाली होती. पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यावर सकारात्मक आश्‍वासन दिले होते. मात्र, मालधक्का हलविण्याचा विषय केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी नामंजूर केला होता, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी (ता. १६) दिली. मालधक्क्याचा विषय केंद्र सरकारचा आहे, त्यात कोणी काही करू शकत नाही. त्यामुळे सुरत रेल्वेमार्गावरील पाळधीला स्थलांतरित होत असलेला मालधक्का आता मुंबई रेल्वेमार्गावरील शिरसोली येथे स्थलांतरित होणार आहे. दोन्ही भाग माझ्याच मतदारसंघात येतात. त्याचा आनंद असून, त्यामुळे शिरसोली येथे मालधक्का आल्यावर त्याचा विकास केला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. मालधक्का लवकरच शिरसोलीला स्थलांतरित होणार असल्याने शहरवासीयांची वाहतूक कोंडी व अपघातातून सुटका होणार आहे.  
 

संपादन-भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

पत्नीच्या खून प्रकरणी पती-सासऱ्यासह ८ जण तुरुंगात गेले, १२ वर्षांनी जिवंत सापडली महिला

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

SCROLL FOR NEXT