जळगाव

शिधापत्रिका नसलेल्यांना मिळणार मे-जूनचे एकाच वेळी धान्य

वृत्तसंस्था

जळगाव : "कोरोना'च्या संकटामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे होणारे हाल पाहता शासनाने शिधापत्रिका नसलेल्यांना (रेशनकार्ड) प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ व एक किलो चणा देण्याचे जाहीर केले आहे. या अंतर्गत शिधापत्रिका नसलेल्यांना मे व जून या महिन्यांचे धान्य एकाच वेळी या महिन्यात दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली. 

"कोरोनो'च्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या "लॉकडाउन'मुळे मजुरांना कामे करता येणे शक्‍य नव्हते. दोन ते अडीच महिने त्यांच्या हाताला काम नव्हते. अशांचे अन्नासाठी हाल व्हायला नको, म्हणून शासनाने केशरी शिधापत्रिकाधारकांनाही एप्रिल, मेमध्ये शासकीय दरात स्वस्त धान्य दुकानांतून धान्य दिले. प्रश्‍न उरला तो ज्यांच्याकडे शिधापत्रिकाच नाही अशांनी काय करायचे? शिधापत्रिका नसताना धान्य कसे द्यायचे ते? शासनाने शिधापत्रिका नसलेल्यांची यादी तयार करून त्यांना मे व जूनमध्ये पाच किलो तांदूळ, एक किलो चणा देण्याचे जाहीर केले. त्यानुसार प्रत्येक तहसील कार्यालयात शिधापत्रिका नसलेल्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या. त्यामध्ये एक लाख 85 हजार 836 जण आढळून आले, की ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही. 
मागील महिन्यात धान्य उशिरा आले. आता मात्र पूर्ण धान्य पुरवठा झाला आहे. तो स्वस्त धान्य दुकानदारांकडे रवानाही झाला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांचा विविध मागण्यांसाठीचा संपही मिटला आहे. त्यामुळे संबंधितांनी स्वस्त धान्य दुकानांत जाऊन धान्याची मागणी करावी. 


शिधापत्रिका नसलेल्यांनी आपापल्या परिसरातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे जाऊन तांदूळ व चणा यांची मागणी करावी. शिधापत्रिका नसल्याबाबत नगरसेवक, लोकप्रतिनिधींच्या सहीचे पत्र सोबत न्यावे. 
- सुनील सूर्यवंशी 
जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT