crop insurance sakal
जळगाव

विमा न काढलेल्या शेतकऱ्यांनाही मदत

विमा न काढलेल्या शेतकऱ्यांनाही मदत

सकाळ डिजिटल टीम

रावेर (जळगाव) : केळी विम्याच्या अन्याय्य निकषांमुळे मागील वर्षी ज्या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विमा (Farmer Fruit Crop Insurance) काढला नाही, त्यांनाही शासनाकडून नुकसान भरपाई देण्याचा विचार करीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘सकाळ’शी (Water supply minister gulabrao patil) बोलताना दिले. गुरुवारी (ता २७) येथे झालेल्या केळीच्या वादळी वाऱ्याच्या नुकसानभरपाई पाहणी दौऱ्यात अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील यांच्या निवासस्थानी त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. त्यांनी सांगितले, की ज्यांनी विमा काढला त्यांना भरपाई मिळणार आहेच पण ज्यांनी विमा काढला नाही, त्यांना भरपाई मिळण्यासाठी दौरा असल्याचे त्यांनी सांगितले. (ravel-tour-gulabrao-patil-farmer-Fruit-Crop-Insurance)

पालकमंत्री श्री. पाटील यांनी तालुक्यातील विटवा गावाजवळील वादळाने नुकसान झालेल्या केळी बागेची पाहणी केली. या वादळाने केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगून अंतिम पंचनाम्याच्या अहवालाची प्रतीक्षा आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील रायगड जिल्ह्यातील तोक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई राज्य शासनाने ज्या निकषांवर आधारित दिली त्याच प्रकारे तातडीने रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार चंद्रकांत पाटील, अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, तालुकाप्रमुख योगीराज पाटील, तहसीलदार उषा राणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

खिर्डीत शिवारातही पाहणी

खिर्डी : शिवारातील ऐनपूर, सुलवाडे या भागातही पालकमंत्री पाटील यांनी नुकसानग्रस्त केळीबागांची पाहणी केली. शिवारातील परिसरातील गोलवाडे, रेंभोटा, वाघाडी, शिंगाडी, सुलवाडी, कांडवेल, धामोडी, भामलवाडी, कोळदे, यासह इतर गावांमध्ये अंदाजे ४७५ हेक्टरवरील केळी बागांसह अनेक पिकांचे कोट्यावधीचे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

Truck Accident : धारूर घाटात सरकी वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक दरीत कोसळला, प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

Sugar Rate : साखरेच्या दराची कृत्रिम सूज ओसरली! 1500 रुपये प्रतीक्विंटलची घट; साखरेला स्थर्य मिळण्याची शक्यता

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

SCROLL FOR NEXT