जळगाव

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱयांची संख्या जास्त

भूषण श्रीखंडे

जळगाव  : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या नव्या बाधितांपेक्षा अधिक नोंदली गेली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी रेटही ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. दिवसभरात आज ८२० रुग्ण बरे झाले, तर ४०३ नवे रुग्ण आढळून आले. गेल्या २४ तासांत आठ रुग्णांच्या मृत्यूनंतर एकूण बळींची संख्या ११४५ वर पोहोचली आहे.
 
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असताना गेल्या दहा दिवसांपासून नव्याने आढळणारे रुग्ण कमी व बरे होणारे अधिक, असे चित्र दिसत आहे. आज सलग आठव्या दिवशी बरे झालेल्यांची संख्या अधिक होती. दिवसभरात ८२० रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्यांचा आकडा ३६ हजार ७८१ वर पोहोचला असून, बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ८० टक्के झाले आहे. नवीन ४०३ रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ४६ हजार २७५ वर पोहोचली आहे. बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने सध्या ॲक्टिव्ह रुग्ण केवळ आठ हजार ३४९ राहिले आहेत. 


जळगाव शहर शंभरीचा आत  
जळगाव शहरातही गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या काहीशी कमी होऊन बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी एकही मृत्यू नव्हता, तर गुरुवारी व आज केवळ एका मृत्यूची नोंद जळगावात करण्यात आली. तर शहरात आज नव्याने ९१ रुग्ण आढळून आले, तर दिवसभरात २५६ रुग्ण बरे झाले. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर- ९१, जळगाव ग्रामीण- १३, भुसावळ- ६६, अमळनेर- २९, चोपडा- ३०, पाचोरा- २, भडगाव- ४, धरणगाव- २०, यावल- ३३, एरंडोल- २१, जामनेर- १८, रावेर- ७, पारोळा- २४, चाळीसगाव- ३५, मुक्ताईनगर- १०, बोदवड- ५.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT