जळगाव

रेमडेसिव्हिरचे तीन हजार डोस मिळणार;मंत्री शिंगणेंची ग्वाही 

सचिन जोशी

जळगाव: कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यानंतर जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. असे असले तरी जिल्ह्यात तीन हजार इंजेक्शनचे डोस प्राप्त होतील, अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना दिली. 

गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून, ही दुसरी लाट पहिल्या टप्प्यातील लाटेपेक्षा अधिक तीव्र आहे. त्यामुळे महिनाभरातच सक्रिय रुग्णांची संख्या दहापटीने वाढून ती दहा हजारांवर पोचली आहे. यातील बहुतांश रुग्णांना कोरोनावर उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज भासत असून, त्याची मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण होऊन काळा बाजारही वाढला आहे. 


खडसेंचा पाठपुरावा 
या स्थितीत इंजेक्शनअभावी अनेक रुग्णांना जीवही गमवावा लागत असून, जिल्ह्यात भीषण स्थिती निर्माण झाल्याने माजी मंत्री खडसे यांनी याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्त अनिल माणिकराव यांच्याशी चर्चा केली. या इंजेक्शनसाठी लागणारा कच्चा माल आयात होतो, त्यात अडचणी आल्याने उत्पादनावर मर्यादा आल्या. त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.  

मंत्री शिंगणेंशी चर्चा 
या संदर्भात खडसे व डॉ. जगवानी यांनी राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केली. उत्पादन व पुरवठा होत नाही, तोवर जिल्ह्यातील नागरिकांचे बळी जाऊ द्यायचे काय, असा प्रश्‍न करत खडसे यांनी मंत्र्यांना रेमडेसिव्हिरच्या पुरवठ्याबाबत विनंती केली. त्यानुसार बुधवारी जिल्ह्यात रेमडेसिव्हिरच्या किमान तीन हजार व्हायल्स पुरविल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच १२ एप्रिलनंतर रुग्णांसाठी आवश्‍यक साठा उपलब्ध होऊन डोसेजचा पुरवठा सुरळीत होईल, असेही सांगण्यात आले. 


कच्च्या मालाअभावी उत्पादनावर परिणाम 
खडसेंनी रेमडेसिव्हिरच्या मागणी व पुरवठ्याबाबत पाठपुरावा केला असता इंजेक्शनच्या उत्पादनावर परिणाम झाल्याची बाब समोर आली. काही दिवसांपूर्वी सुएझ कालव्यात जहाज अडकल्याने त्यातून येणाऱ्या मालाचा पुरवठा ठप्प झाला. त्या जहाजातच रेमडेसिव्हिरचा कच्चा मालही येत होता. तो वेळेत पोचू न शकल्याने इंजेक्शनच्या उत्पादनावर परिणाम झाला. हा माल प्राप्त झाला असला तरी त्यावर प्रक्रिया करून इंजेक्शन उत्पादनासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत.  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: पाऊस थांबायचं नाव नाही! पुण्यात दरड कोसळली, नाशिकला ढगफुटीचा इशारा अन्...; आज कुठे काय घडलं? वाचा संपूर्ण अपडेट

IND vs ENG, 3rd T20I : भारताविरुद्ध आघाडी घेण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज! सामन्यासाठी यजमानांची Playing XI जाहीर

11th Special Round Extended: अतिवृष्टीचा फटका: अकरावी प्रवेशाच्या पहिल्या विशेष फेरीची मुदत बुधवारीपर्यंत वाढ, सुधारित वेळापत्रक जाहीर

Pune Heavy Rain Alert: कर्जत घाटात दरडींचा तडाखा; मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प, १६ गाड्या रद्द

U19 IND vs SL : ९ चौकार अन् १ षटकार... द्रविडच्या लेकाची जोरदार फटकेबाजी; पण श्रीलंकेने सामना जिंकत केली ODI मालिकेत बरोबरी

SCROLL FOR NEXT