

Maharashtra Rain Update
ESakal
मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी (६ जुलै) पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात ३ जणांचा मृत्यू झाला आणि २३ जणांना वाचवण्यात आले. मंगळवारी (७ जुलै) नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता आहे. ढगफुटीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर मंगळवारी बंद राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व मंदिरे, तसेच पर्यटन स्थळेही बंद राहतील. शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयेही बंद राहतील.