जळगाव

ना अँड्रॉइड फोन, ना नेटवर्क... सांगा कसं शिकायचं? 

रवींद्र कोलते

न्हावी (ता. यावल) : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने ऑनलाइन वर्ग घेण्यास सुरवात केली. मात्र, ग्रामीण भागात विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी साधनसामग्री आहे का, हाही मोठा प्रश्न आहे. ना अँड्रॉइड फोनची उपलब्धता, ना नेटवर्क अशा अनेक अडचणींचा सामना ग्रामीण भागात करावा लागत आहे. 


कोरोनामुळे मार्चपासून शिक्षणसंस्था बंद आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. अनेक परीक्षा पुढे ढकलल्या. परिणामी, विद्यार्थ्यांचा अभ्यासही थांबला, अशा वेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. अनेक खासगी संस्थांनी व्हॉट्सॲप ग्रुप, यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाइन क्लासेस सुरू केले आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा वापर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करता येणे गरजेचे असून, यासाठी स्मार्टफोन, लॅपटॉप, इंटरनेट आदी गोष्टीही त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे. आजही ग्रामीण भाग काही ठिकाणी इंटरनेटची सुविधा लाभापासून वंचित आहे. अनेक विद्यार्थी यापासून वंचित राहतील, यात शंका नाही, पण यातून निर्माण होणाऱ्या परिणामांचे काय? यामुळे मुलांचे डोळे आणि मेंदू आजारी होत आहे. ऑनलाइन शिक्षण आजच्या काळाची गरज आहे. 

ऑनलाइन शिक्षण काळाची गरज आहे, परंतु लहान मुलांना ते जमत नाही. मोठी मुले समजू शकतात. बऱ्याच जणांजवळ अँड्रॉइड मोबाईल नाही. विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना समजण्यापलीकडे आहे. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. 
-यशवंत तळेले, पालक 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT