school open
school open 
जळगाव

पालकांचे सोडा आता शाळांचीही ‘ना’; मंगळवारपासून शाळा होणार सुरू 

देविदास वाणी

जळगाव : कोरोना संसर्गाचा सामना करीत जिल्हा प्रशासनाने मंगळवार (ता. ८)पासून नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने शाळा निर्जंतुकीकरणाची कामे सुरू आहेत. असे असले तरी पालकांनी संमती दिली, तरच पाल्यांना शालेत जाता येणार आहे. जिल्ह्यात नववी ते बारावीच्या दोन लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ ५२ हजार पालकांनी संमतीपत्र दिले असून, तब्बल दीड लाख पालकांनी नकार दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यात ८५६ शाळांपैकी १८८ शाळांनीही शाळा सुरू करण्यास सहमती दर्शविलेली नाही, हे विशेष! 
जिल्ह्यात मंगळवारपासून शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने संबंधित शाळांना तयारी करण्यास सांगितले आहे. शाळा सुरू करण्यासाठी तयारीची पाहणी गेल्या आठवड्यापासून शिक्षण विभागाचे अधिकारी विविध ठिकाणी भेटी देऊन करत आहेत. आतापर्यंत ८५६ पैकी ७५० शाळांची तपासणी झाली आहे. 
शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी भडगाव येथील सौ. सु. गी पाटील माध्यमिक विद्यालयास भेट देत तयारीचा आढावा घेतला. सौ. ज. ग. पूर्णपत्री कनिष्ठ महाविद्यालयात केंद्रप्रमुख रवींद्र सोनवणे, एस. बी. शिंदे यांच्यासह भेट दिली. या भेटीत शिक्षणाधिकाऱ्यांना शाळेने केलेल्या तयारीची माहिती देण्यात आली व शाळा सुरू करण्यास संमती देण्यात आली. उपमुख्याध्यापक के. एस. पाटील, उपप्रचार्या राय, पर्यवेक्षक अरुण पाटील, एस. एम. पाटील, मुख्य लिपिक देवरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
 
आकडे बोलतात… 
एकूण शाळा : ८५६ 
विद्यार्थी : दोन लाख १७ हजार ९१ 
शिक्षक : नऊ हजार ६६७ 
शिक्षकेतर कर्मचारी : तीन हजार २६१ 
कोरोना चाचणी झालेले शिक्षक : आठ हजार ८८६ 
पॉझिटिव्ह शिक्षक : १४ 
संमतीपत्र दिलेले पालक : ५२ हजार ५२७ 
बैठका घेतलेल्या शाळा : ७०२ 
निर्जंतुकीकरण झालेल्या शाळा : ६२५ 
शाळा सुरू करण्यास होकार दिलेल्या शाळा : ६६८  

संपादन ः राजेश सोनवणे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT