जळगाव

मृत्युचा तांडव सुरूच; एकाच दिवसात कोरोना बांधित १७ जणांचा मृत्यू 

सचिन जोशी

जळगाव  : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आज एका दिवसात १७ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंतचा एका दिवसातील हा उच्चांकी आकडा आहे. गेल्या २४ तासांत ८३५ नवे रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३४ हजार पार करून गेली, तर नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून, ९६१ जणांना आज घरी सोडण्यात आले. 

जळगाव जिल्हाच कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ बनत आहे. दररोज आठशे- हजार रुग्ण आढळून येत आहेत, तसेच मृत्यूचे सत्रही थांबताना दिसत नाही. रुग्णसंख्या वाढीमुळे मृत्यूदर कमी दिसत असला, तरी दररोज आठ- दहाच्या संख्येत होणाऱ्या मृत्यूंनी मंगळवारी तब्बल १७ चा आकडा गाठला. त्यामुळे एकूण बळींची संख्या ८९४ झाली आहे. मृत्यूंत ४० वर्षीय युवकासह अन्य १६ रुग्ण ५० वर्षांवरील आहेत. आज दिवसभरात प्राप्त अहवालात ८३५ रुग्ण आढळून आल्याने एकूण आकडा ३४ हजार ४५३ वर पोहोचला आहे. दिवसभराची दिलासादायक बाब ही, की आज नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त आहे. आज ९६१ रुग्णांना घरी सोडल्यानंतर एकूण बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ३०४ वर पोहोचली आहे. 

जळगावात भिषण स्थिती

जळगाव शहरातील स्थिती अधिकच भीषण होत आहे. जिल्ह्यातील आजच्या १७ मृत्यूंपैकी ५ जण जळगाव शहरातील आहेत, तर मंगळवारी शहरात सापडलेल्या रुग्णांच्या १९९ या आकड्यामुळे एकूण रुग्णसंख्या सात हजार ८०० झाली आहे. शहरातून आज ११३ जण बरे झाले. अमळनेर तालुक्यातील २३७ व पारोळ्यातील २५५ रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. 

 
असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर- १९९, जळगाव ग्रामीण- ३५, भुसावळ- ३४, अमळनेर- १०५, चोपडा- ५१, पाचोरा- ६, भडगाव- ११, धरणगाव- ८, यावल- ३९, एरंडोल- ७५, जामनेर- ६२, रावेर- ८, पारोळा- ९५, चाळीसगाव- ८०, मुक्ताईनगर- २०, बोदवड- ७.  

संपादन- भूषण श्रीखंडे

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT