Parola Shiv Sena 
जळगाव

पारोळ्यात शिवसेना आक्रमक..राणेंच्या विरोधात घोषणा,फोटो जाळले

महामार्गावर घोषणा देवुन राणेंच्या प्रतिकात्मक फोटोची जाळपोळ करण्यात आली.

संजय पाटील

पारोळा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचे बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Minister Narayan Rane) यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने (Shiv Sena district chief Dr. Hershel Mane) यांनी पारोळा पोलिसांना (Parola Police) केली आहे. या प्रकरणी पारोळ्यातील शिवसैनीक आक्रमक होवून पारोळा शहरातील महामार्गावर मंत्री राणे यांच्या विरोंधात घोषणाबाजी करून प्रतिमा जाळण्यात आली.

केंद्रीय मंत्री राणे यांनी महाड येथील पत्रकार परिषदेत राज्याचे कुटुंब प्रमुख व देशात नावलौकीक मिळविलेल्या आदर्श व्यक्तीमत्व असलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे बाबत आक्षेपार्ह विधान केले होते. सदर बाब ही निंदणीय असुन याचा पारोळा तालुका शिवसेनेने निषेध करुन पारोळा पोलिसात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी पारोळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांना शिवसेनेच्या वतीने गुन्हा दाखल बाबत निवेदन देण्यात आले.

Parola Shiv Sena

राणेंविरोधात घोषणा, फोटोची जाळपोळ

मुख्यमंत्री विरोधात आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी शिवसेनेच्या वतीने महामार्गावर घोषणा देवुन राणेंच्या प्रतिकात्मक फोटोची जाळपोळ करण्यात आली. यावेळी महामार्गावर मोठी गर्दी जमा झाल्याने काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.

याचा होता सहभाग..

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख डाँ हर्षल माने,तालुकाप्रमुख प्रा आर बी पाटील,शहर प्रमुख अशोक मराठे,विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील,जळुचे माजी सरपंच रविंद्र जाधव,राजु बागडे,युवा सेनेचे आबा महाजन,दिपक शिंपी,सावन शिंपी,बाळु पाटील,भैय्या महाजन,गोपाल देशमुख,पराग गुंजाळ,चोरवडचे उपसरपंच किरण पाटील यांचेसह शिवसेना,युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT