जळगाव

चांदीच्या दरात वाढ...भाव जाणार लाखावर !

सचिन जोशी

जळगाव : सोन्यापेक्षाही आता चांदी भाव खाऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत चांदीचा दर तब्बल साडेतीन ते चार हजारांनी वाढला, तर सोन्यानेही सहाशे रुपयांनी उसळी घेतली. गेल्या आठवडाभरात चांदीला तब्बल आठ-नऊ हजारांच्या दरवाढीची चकाकी आली. अशीच दरवाढ सुरू राहिली तर दोन महिन्यांत चांदीसाठी प्रतिकिलो एक लाख रुपये मोजावे लागतील, अशी शक्यता व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे. 
गेल्या चार महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

लॉकडाउननंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली, व्यवसायही पूर्वपदावर येत असताना सोने-चांदी भाव खाऊ लागले आहे. गेल्या १५ दिवसांतील तुलनात्मक दर बघता या काळात सोन्याचा भाव पाच ते सहा हजारांनी वधारला. दुसरीकडे चांदीची दरवाढ सुसाट सुरू झाली आहे. चांदीने गेल्या २४ तासांत साडेतीन-चार हजारांनी उसळी घेतली. 

चांदी जाणार लाखावर 
१९ जुलैस सोन्याचा दर ५१ हजार ७०० (प्रतितोळा), तर चांदी ५३ हजार ७०० (प्रतिकिलो) होती. गुरुवारी जळगावच्या बाजारपेठेत सोने ५६ हजार २००, तर चांदी ७५ हजार ५०० वर पोचली. म्हणजे चांदीचा भाव गेल्या १५ दिवसांत तब्बल २१ हजारांनी वाढला आहे. 

ही आहेत कारणे 
येत्या काही दिवसांत हे दर आणखी वाढण्याची शक्यता असून, जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल, कोरोनाचे संकट, आर्थिक मंदी व आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढ ही यामागची कारणे असल्याचे सांगितले जात आहे. 

असा होता भाव (जळगाव बाजार, जीएसटीसह) 
सोने : ५६,२०० (प्रतितोळा) 
चांदी : ७५,५०० (प्रतिकिलो) 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Veer Sugar Factory: किसनवीर साखर कारखान्यात कामगारांचा उद्रेक, अनेक वर्षांपासून पगार नाही; मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील विरोधात संताप

IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

SCROLL FOR NEXT