जळगाव

सापाला आपटून-आपटून केले ठार; व्हिडीओ व्‍हायरल

सर्पाला आपटून-आपटून केले ठार; व्हिडीओ व्‍हायरल, वन्‍यजीव संस्‍थेकडून कारवाईची मागणी

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : पहुर (ता.जामनेर) येथे एकाने ‘धामण’ जातीच्या सर्पास जमिनीवर आपटून आपटून ठार मारल्याची घटना आज घडली. याबाबत वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. (jalgaon-snake-was-struck-and-killed-video-viral-action-from-wildlife-organization)

एका शेतातून संशयित तरुण धामण सर्पांचा पाठलाग करत येतोय. मुख्य रस्त्यावरून एका दुचाकीवर चार तरुण जात असताना धामण सर्प त्यांच्या दुचाकी जवळ येतो आणि ते खाली पडतात. पाठोपाठ संशयित तरुण तो धामण साप पकडून त्याला तात्काळ आपटून ठार करतो. खुप मोठे काम केले या आविर्भावात वावरतो. माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी ही कृती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समाजमन सुन्न झाले होते.

नंबर प्‍लेटवरून शोध

हा व्हिडीओ समोर येताच त्यातील दुचाकीवर दिसणाऱ्या (एमएच-१९ बीबी-१४९०) क्रमांकाला बघून वन्यजीव संरक्षण संस्थेच्या जिल्हातील कार्यकर्त्यांनी शोध घेण्यास सुरवात केली. मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे यांनी जळगाव वनविभागाचे उपवन संरक्षक विवेक होशिंग यांना सदर व्हिडीओ, पाठवला आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच विवेक होशिंग साहेबानी संबंधित रेंज ऑफिसला तात्काळ त्या दुचाकींचा आणि धामण सापास मारणाऱ्या तरुणांचा शोध घेऊन दोषींवर कारवाईचे करण्याचे आदेश दिले.

कोणताही वन्यजीव हाताळणे, त्याचा पाठलाग करणे, जखमी करणे, ठार मारणे , वन्यजीवास त्रास होईल असे कुठलेही कृत्य वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ शिकार कलम अंतर्गत गुन्हा ठरते. त्यानुसार गुन्हेगारास जबर शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून भविष्यात अश्या घटना घडणार नाहीत.

– बाळकृष्ण देवरे, वन्यजीव संरक्षण संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT