accident 
जळगाव

जिथे दिली सेवा तिच जागा ठरली काळ...एसटी वर्कशॉपमध्ये अपघात 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाच्या एसटी वर्कशॉपमध्ये दुरूस्त झालेली बस रिव्हर्स घेतांना दोन बसच्यामध्ये दबले गेल्याने दुर्दवी अंत झाला. दहा दिवसांच्या सुटीनंतर कामावर आल्यानंतर वर्कशॉपमधील चार्जमन असलेले भिकन लिंडायत हे अविरत सेवेत होते. त्याच जागेवर त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. 

राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाच्या विभागीय कार्यशाळा नेरी नाका स्मशानभूमीजवळ आहे. सकाळी नऊला ड्युटी सुरू झाल्यानंतर एसटी वर्कशॉपमध्ये आज हा अपघात घडला. वर्कशॉप चार्जमन म्हणून कार्यरत असणारे भिकन शंकर लिंडायत (वय 57) हे दुरूस्त झालेल्या एका बस चालकाला हात मागे करून दिशा दाखवत होते. परंतु मागे दुसरी उभी असलेल्या बसचा अंदाज आला नाही. यातच चालकाने गाडी जोरात रिव्हर्स घेतल्याने त्यांना धक्का लागला. यामुळे दोन्ही बसच्यामध्ये लिंडायत हे दबले गेले. वर्कशॉपमधील कर्मचारी सुनिल साळुंखे, गोकुळ पाटील, प्रशांत चौधरी, विलास सोनवणे, व्ही. एन. सैंदाणे, सी. एम. वाघ यांनी त्यांना लागलीच खासगी रूग्णालयात दाखल केले असता ते उपचारासाठी घेण्यास नकार दिला. यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात निघाले असताना रस्त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 


अवघ्या काही क्षणात होत्याचे नव्हते झाले 
वर्कशॉपमध्ये कामाला सुरवात झाली असताना कर्मचाऱ्यांची येथे लगबग सुरू होती. परंतु अवघ्या काही क्षणांमध्ये झालेल्या या अपघातामुळे एसटी वर्कशॉपमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. दहा दिवसानंतर कामावर आलेले लिंडायत हे सर्वांशी बोलून आणि भेटून कामाला लागले होते. या वर्कशॉपमध्ये दुरूस्त करण्यात आलेल्या बसला पार्किंग करण्यासाठी चालकास मागे उभे राहून ते दिशा दाखवत होते. पण अवघ्या काही क्षणात त्यांना जीव गमवावा लागला आहे. 

सेवेचे उरले होते सहा महिने 
भीकन शंकर लिंडायत हे गेल्या दहा दिवसांपासून सुटीवर होते. मोठ्या सुटीनंतर ते आज सकाळी ड्युटीवर रूजू झाले असतांना त्यांना मृत्यूने गाठले. शिवाय, लिंडायत हे आपल्या प्रदिर्घ सेवेनंतर एसटी महामंडळाच्या सेवेत जानेवारी महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. सहा महिन्यांच्या सेवानिवृत्तीपुर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वतः लाटते पोळ्या, मोदकही बनवते, 'या' ठिकाणी आहे मराठी अभिनेत्रीचं हॉटेल; मेन्यू सांगत म्हणाली- गणपतीत...

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT