BJP MP Nilesh Rane BJP MP Nilesh Rane
जळगाव

ठाकरे सरकारला मराठा आरक्षण द्यायचेच नाही

केंद्र सरकारचा आरक्षणाशी संबंध नाही. तरीही यासंदर्भात केंद्राने पुनर्विचार याचिका दाखल केली

सकाळ डिजिटल टीम


जळगाव : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) बाजू मांडण्यात राज्य सरकार कमी पडले. ठाकरे सरकारच्या एकाही मंत्र्याला मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) अभ्यास नाही. त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचेच नाही, म्हणून यात सर्व घोळ करुन ठेवलाय, असा आरोप भाजपचे माजी खासदार निलेश राणे (BJP MP Nilesh Rane) यांनी आज जळगावात केला. (state government does not want to maratha reservation mp nilesh rane allegations)

मराठा आरक्षणाच्या विषयाबाबत श्री. राणे राज्यात दौरा करत असून त्याअंतर्गत ते सोमवारी जळगावी आले होते. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. केंद्र सरकारचा (Central Government) या विषयाशी संबंध नाही. आरक्षण द्यायचे तर त्या समाजाचे मागासलेपण सिद्ध करावे लागेल. त्यासाठी राज्याने मागास आयोग नेमला पाहिजे, त्या आयोगाने अहवाल तयार करुन राज्यपालांकडे व नंतर तो राष्ट्रपतींकडे सादर करावा लागेल. ही प्रक्रियाच राज्य सरकारने (State Government) करणे अपेक्षित आहे. महिनाभरानंतर राज्य सरकारने हा आयोग स्थापन केला, त्याला इतका उशीर का? असा प्रश्‍न राणेंनी उपस्थित केला.

केंद्राचा संबंध नाही
केंद्र सरकारचा आरक्षणाशी संबंध नाही. तरीही यासंदर्भात केंद्राने पुनर्विचार याचिका दाखल केली, परंतु राज्याने अद्याप ही याचिका दाखल केलेली नाही. त्यामुळे सरकारला मराठा आरक्षण द्यायची इच्छाच नाही. फडणवीस सरकारने हे आरक्षण टिकवलं होतं, सरकारने मराठा आरक्षणासह ओबीसींचे आरक्षणही घालवले, असा आरोप राणेंनी केला.

Maratha reservation

राजेंनी ठाकरे सरकारला जाब विचारावा
संभाजीराजेंच्या आरक्षणाबाबतच्या भुमिकेवर राणे म्हणाले, ती त्यांची भूमिका आहे. त्यांनी मोर्चा, आंदोलनाची तारीख पक्षाला विचारुन जाहीर केलेली नाही. पक्ष त्याबाबत निर्णय घेईल. त्यापेक्षा संभाजीराजेंनी याबाबत ठाकरे सरकारला जाब विचारावा, असे ते म्हणाले. या वेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, चंदू पटेल, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, दीपक सूर्यवंशी, प्रभाकर पवार आदी उपस्थित होते.

संजय राऊत पगारी माणूस
मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाण, संजय राऊत यांच्यातच मतभेद असल्याबाबत विचारले असता राणे म्हणाले, संजय राऊत हा ठाकरेंचा पगारी माणूस आहे. मूळ विषयावर ते बोलत नाही, आणि दुसराच विषय घेऊन बोलतात व तीच चर्चा दिवसभर चॅनेलवर चालते, अशा शेलक्या शब्दात त्यांनी राऊतांचा समाचार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT