crime 
जळगाव

जळगावः राज्यभर धुमाकुळ घालणारे सोनसाखळी चोर अटकेत

गुन्ह्यात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी गुन्ह्यांवर लक्ष केंद्रीत केले.

सकाळ वृत्तसेवा


जळगाव: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने शहरातील कॉलन्यांमधून मंगलपोत लांबवणाऱ्या राज्यस्तरीय (Thief) टोळीचा जिल्‍हापेठ पोलिसांनी छडा लावला आहे. जळगाव- औरंगाबाद रोडवरील बहुसंख्य सीसीटीव्हीची धुंडाळणी केल्यावर संशयितांनी नाशिकात बस्तान मांडल्याचे आढळून आले होते. सलग चार दिवस- रात्र पाळत ठेवून दोन अट्टल गुन्हेगारांना (Criminal) अटक करण्यात आली आहे. संशयितांनी राज्यभर गुन्हे (Police Case) केले असून शहरातील आठ गुन्ह्यांची कबुली दिल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे (District Superintendent of Police Dr. Praveen Mundhe) यांनी सांगितले.


जिल्‍हापेठ पोलिस व रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी चार- चार गुन्ह्यांत महिलांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांचे मंगळसूत्र लंपास झाल्याच्या घटना गेल्या नऊ महिन्यात सातत्याने घडत होत्या. दाखल गुन्ह्यात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी गुन्ह्यांवर लक्ष केंद्रीत करुन ७ सप्टेंबर रोजी जिल्‍हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना दुसऱ्याच दिवशी औरंगाबाद जिल्‍ह्‍यात गुन्हा घडला होता. जळगाव ते औरंगाबाद दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रेालपंप, हॉटेल्स आणि नाक्यांचे सीसीटीव्हीची तपासणी करुन जळगावातील गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीचा छडा लावण्यात आला. संशयितांचा शोध घेत असताना निरीक्षक रामदास वाकोळे यांच्या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे, सलीम तडवी, रवींद्र साबळे, विकास पहुरकर, समाधान पाटील, विनोंद पाटील अशांना तपासात नियुक्त करण्यात आले होते. संशयितांचा शोध घेत पोलिस पथकाने गेली चार दिवस सलग नाशिक शहरात ठाण मांडून संदीप सोनवणे (वय ३३, रा. श्रमिकनगर), सतीश चौधरी (वय ३२, रा. शरदनगर, कलेक्टर पट्टा मालेगाव) अशा दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच संशयितांनी एका मागून एक आठ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.



तपास पथकाचे कौतुक
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी चिकाटीने केलेल्या तपासाबाबत समाधान व्यक्त करुन शहरातील आठ आणि नाशिक परीक्षेत्रातील इतरही गुन्ह्यांचा छडा या भामट्यांकडून लागणार असल्याबद्दल पथकाचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: रोहित शर्मा, विराट कोहली कर्णधार शुभमन गिलसह ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही? प्रवासाच्या तारखा आल्या समोर

Pulse Polio Vaccination : रविवारी ३ लाख बालकांना मिळणार ‘दो बॅुंद जिंदगी के’

Navi Mumbai Airport: दि. बा. पाटलांच्या नावाची घोषणा नाहीच! प्रकल्पग्रस्तांच्या उत्साहावर विरजण

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' मार्गावर अवजड वाहनांना बंदी, पर्यायी मार्ग कोणते?

Latest Marathi News Live Update : उमरखेड - ढाणकी रोडवर चक्काजाम आंदोलन

SCROLL FOR NEXT