जळगाव

कोरोना नियंत्रणासाठी कडक नियोजन करावे : अपर मुख्य प्रधान सचिव करीर 

सकाळवृत्तसेवा

जळगाव :  जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्ग बाधीतांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत सतर्क राहून काम केले पाहिजे. राज्यातील इतर जिल्ह्यात झालेल्या कोरोना संसर्गाचे कारण व जळगाव जिल्ह्यातील झालेला कोरोनाचा शिरकाव याची कारणे भिन्न आहेत. त्याचा शोध घेऊन भविष्यातील संसर्ग वाढणार नाही त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांनी काल नाशिक येथे दिल्या आहेत. 

नाशिक येथे झालेल्या जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना श्री.करीर बोलत होते. 

विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छोरिंग दोरजे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटोडे आदी उपस्थित होते. 

फैलावाचे स्वतंत्र विश्‍लेषण करा 
श्री.करीर म्हणाले, राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या कोरोना संसर्गाच्या फैलावाचे विश्‍लेषण केले जात असून त्यात प्रत्येक जिल्ह्यात झालेल्या कोरोना संसर्गाची कारणे ही समान आढळून येतात. परंतु जळगाव जिल्हा याला अपवाद असून जळगाव जिल्ह्यात झालेल्या कोरोना फैलावाचे स्वतंत्र विश्‍लेषण जिल्हा प्रशासनाने केल्याशिवाय त्यात ठोस उपाययोजना करता येणार नाहीत. जेवढ्या जास्त टेस्ट तेवढे पेशंट असणार व जेवढ्या जास्त प्रमाणात सर्वेक्षण केले तेवढ्या जास्त प्रमाणात या संसर्गाचा अंदाज प्रशासनाला घेता येतो. जळगावात रुग्णवाढी सोबतच कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचेही विश्‍लेषण होणे गरजेचे आहे. जळगावात पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ असून या मनुष्यबळाचे योग्य नियोजन करून भविष्यात संभाव्य पावसाळी साथरोग व कोरोनाचा संसर्ग यांचे एकाचवेळी आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे. 

चर्चेत जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे, महापालिका आयुक्त कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.उगले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पाटोडे यांनी सहभाग घेतला. आपापल्या कार्यक्षेत्रातील वस्तुनिष्ठ माहिती महसूल विभागाचे अपर मुख्य प्रधान सचिव करीर यांना सादर केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT