BHR Scam 
जळगाव

बीएचआर प्रकरणःझंवर नेटवर्किंगमध्ये रिक्षाचालकही भरायचा ई-निविदा

BHR Scam News : प्रत्यक्षात ही प्रक्रिया सर्व टेंडर अटक आरोपी व त्यांच्या संबंधितांना मिळतील या दृष्टीने नियंत्रित केलेली होती.

सकाळ डिजिटल टीम

भाईचंद हिराचंद मल्टिस्टेट पतसंस्थेच्या मालमत्ता विक्रीच्या लिलावात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग घेतला. ही लिलाव प्रक्रिया केवळ कागदपत्री वेबसाइटद्वारे भासविली आहे.


जळगाव : बीएचआरची (BHR Scam) मालमत्ता गिळंकृत करण्यासाठी सुनील झंवरने नियोजनबद्धरीत्या कट रचला. बहुतांशी मालमत्ता विक्रीच्या ई-टेंडरिंगमध्ये (E-tendering) त्याच्या संस्थेतील नोकर व शालेय पोषण आहाराच्या धान्य वाहतुकीसाठी वाहन पुरविणारे ठेकेदार, इतकेच काय तर त्याच्या रमेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या (Driving school) रिक्षाचालकाच्या नावाने ई-टेंडर भरल्याचे समोर आले आहे. तपास यंत्रणेने अशा २२ लोकांच्या नावांची यादीच न्यायालयात सादर केली.


सुनील झंवर गुन्ह्यातील मुख्य संशयित असून, तो यापूर्वीच अटक केलेल्या सूरज झंवर याचा पिता आहे. दोघांनी भागीदारीत विविध संस्थासंह कंपन्या उभ्या केल्या आहेत. त्याच कंपन्यांच्या नावाने संशयितांनी पूर्वनियोजित कट करून भाईचंद हिराचंद मल्टिस्टेट पतसंस्थेच्या मालमत्ता विक्रीच्या लिलावात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग घेतला. ही लिलाव प्रक्रिया केवळ कागदपत्री वेबसाइटद्वारे भासविली आहे. प्रत्यक्षात ही प्रक्रिया सर्व टेंडर अटक आरोपी व त्यांच्या संबंधितांना मिळतील या दृष्टीने नियंत्रित केलेली होती.

भागीदारी अन्‌ निविदाप्रक्रिया
सुनील झंवर हा श्री साई मार्केटिंग ॲन्ड ट्रेडिंग कंपनी व श्री सालासार ट्रेडिंग कंपनीमध्ये भागीदार आहे. या दोन्ही कंपन्यांच्या बँक खात्यावरून निविदाधारकांचे बँक खात्यावर पैसे वर्ग करून त्यांच्यामार्फत तिचे स्वतःसाठी टेंडर भरले आहे. या सर्व कंपन्या कागदोपत्री वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यातील आर्थिक व्यवहार एकत्रित असून, या कंपन्यांच्या भागीदारी संस्थांच्या बँक खात्यावरून मोठ्या रकमा वारंवार एकमेकांकडे वर्ग झालेल्या आहेत. अगदी कवडीमोल बीएचआरची मालकी असणाऱ्या संस्था, कंपन्या, जागा मिळविण्यासाठी वेगवेगळ्या ‘डमी’ लोकांना पुढे करण्यात आले. कमी दरात मिळालेल्या या मालमत्ता घेताना रोकड न देता या भामट्यांची चक्क ३० टक्क्यांत ठेवीदारांकडून हिसकावलेल्या ठेवींच्या पावत्या जमा केल्या आहेत.


झंवरसाठी निविदा भरणारे
पूर्वनियोजित कटात सुनील झंवरने साथीदारांशी संगनमत करून बहुतांशी ई-टेंडरिंगमध्ये आपल्या संस्था व त्यांचे शालेय पोषण आहाराच्या कामासाठी वाहन पुरविणारे ठेकेदार, इतकेच नाही तर, रिक्षाचालकाच्या नावानेही मालमत्ता खरेदीचे टेंडर भरायला लावले.


असे आहेत ‘डमी’
यात आलोक शिवानी, हैदर पिंजारी, मनीष मराठे, सौरभ केदारी, रोहित कोठारी, निरंजन कोठारी, प्रशांत महामुनकर, राजेंद्र माळी, मेहेगाराम सैनी, कैलास धूत, अरुण सोनार, जितेंद्र बडगुजर, अनुपम कुलकर्णी, सुदेश भन्साळी, धीरज सोनी, जितेंद्र तातेड, योगेश लढ्ढा, मयूर इंद्राणी, केतन मालू, नितीन भन्साळी, आकाश माहेश्वरी, छगन कोरडे यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

SCROLL FOR NEXT