जळगाव

अन चोरट्यांचा राँग नंबर लागला; घरे फोडूनही काही लागले नाही हाताला

हिरालाल पाटील

कळमसरे ता.अमळनेर :  नीम ता.अमळनेर येथील गावात काल रविवारी रात्री चोरटयानी एका पाठोपाठ तीन घरे फोडली मात्र एकाही घरात काहीही न सापडल्याने चोरांचा राँग नंबर लागल्याची विनोदी चर्चा गावात होत आहे.


नीम येथील कपिलेश्वर रस्त्यालगत राहणाऱ्या दिलीप पौलाद चौधरी यांच्या दुमजली घरात मागच्या बाजूने प्रवेश करीत कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केल्यावर चोरांच्या हाती किरकोळ रक्कम हाती आलेले पाकिट घेऊन खालच्या मजल्यावर येत असताना हातातील पाकिट निसटल्याने घरातील लोक जागी झाल्यावर चोरटयानी परत वरच्या मजल्यावरुन पळ काढला.तर पांडुरंग बंडू चौधरी यांच्याही मागील दरवाजाची जाळी तोडून आतील दरवाजाचे कुलुप तोडण्याचा प्रयत्न केला मात्र तेही शक्य न झाल्याने गावालागत असलेल्या झोपडपट्टीत राजेंद्र दगा भील यांच्याही मागील बाजूने प्रवेश करुण पत्रा पेटी तोडित पेटीतील कागद पत्रे अस्ताव्यस्त केले.

मात्र तेथेही काहीच न सापडल्याने चोरी करण्याचा बेताने आलेले चोरटयाना हाती काहीच न लागल्याने खाया पिया कुछ नही ग्लास फूटे बारा असा काहीसा प्रकार घडल्याने गावात सर्वत्र दिवसभर विनोदी चर्चा होत असली तरी महिलामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील आठवड्यातच धार ता.अमळनेर येथे एकाच रात्रीत सात घरे फोडली होती.दरम्यान नीम गावात घर फोडल्याचे वृत्त मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांना कळताच त्यांनी भेट देत पंचनामा केला. परिसरातील धार आणि नीम गावात एका आठवड्याभरात दोन वेळा घरफोडी झाल्याने रात्रीची गस्त वाढवन्यात यावी अशीही मागणी परिसरातून होत आहे.  

संपादन-भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT