Jalgaon District Bank Election 
जळगाव

मविआचा भाजपला धक्का; जिल्हा बँक निवडणूकीत तिन उमेदवार बिनविरोध

जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या पुर्वीच महाविकास आघाडीकडून भाजपला धक्का देण्याचे काम सुर केले आहे.

भूषण श्रीखंडे

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक निवडणूकीच्या (Jalgaon District Bank Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. यामुळे जिल्हा बँकेत आज अर्ज भरण्याऱ्यांची गर्दी होती. मात्र निवडणूकीच्या सुरवातीलाच महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) भाजपला धक्का दिला असून तीन उमेदवार बिनवीरोध निवडून येणे निश्चीत झाले आहे. त्यामुळे सर्व जागांवर भाजपचे उमेदवार निवडणूक लढविणार असे भारतीय जनता पार्टीच्या दावा खोटा ठरला आहे.

जळगाव जिल्हा बँक संचालक निवडणूकीसाठी आज उमेदवारी दाखल करण्याची शेवटचा दिवस होता. सकाळ पासून जिल्हा बँकेत उमेदवारी दाखल करण्यासाठी नेत्यांची तसेच कार्यकर्त्यांची गर्दी होती. सकाळी भाजपनेते गिरीश महाजन, भाजप खासदार रक्षा खडसे, माजी खासदार ए. टी. नाना पाटील आदी भाजपचा दिगज्जांनी अर्ज दाखल केले. परंतू चर्चा मात्र महाविकास आघाडीने भाजपा दिलेल्या धक्याची असून धरणगावातून संजय मुरलीधर पवार, तर पारोळा आणि एरंडोलमधून अनुक्रमे चिमणराव पाटील व अमोल चिमणराव पाटील याच्या विरुध्द एक ही अर्ज दाखल न झाल्याने या तिघांची बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या पुर्वीच महाविकास आघाडीकडून भाजपला धक्का देण्याचे काम सुर केले आहे.

बिनविरोध उमेदवारांचा सत्कार

धरणगाव प्राथमिक सहकारी सोसायटी मतदारसंघातून फक्त संजय मुरलीधर पवार यांचाच अर्ज दुपारी तीन पर्यंत दाखल होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्‍चीत झाली. तसेच पारोळ्यातून आमदार चिमणराव पाटील व एरंडोलमधून त्यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांची देखील बिनविरोध निवड ही निश्चीत झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे आदी पदाधिकाऱ्यांकडून बिनवीरोध निवड होणाऱ्या उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले.

मी भाजपात सक्रीय..- ए. टी. नाना पाटील

भाजपाचे माजी खासदार ए. टी. नाना पाटील गेल्या काही वर्षापासून राजकारणासाठी अलिप्त होते. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणूकीत अचानक त्यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तूळात आज एकच चर्चा होती. याबाबत त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला असता मी विविध कार्यक्रमातून भाजपात सक्रीय होतो. धुळे-नंदूरबार येथे झालेल्या निवडणूकीत मी सक्रीय असल्याने भाजपात सक्रीय होतो असे मत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Updates : अंधेरी परिसरातील अनेक रस्ते जलमय, प्रशासनाकडून नागरिकांना रस्त्यावरून चालण्यास मनाई

"मला पंडितांकडे जायचंय" ज्योती चांदेकरांची ती इच्छा ऐकताच जुई निशब्द झाली; "तिला स्मशानात असं शांत झोपलेलं..."

Solapur Crime: 'सोलापुरातील आठवीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण'; तरुणाच्या भावजीचा फोननंबर घेऊन पोलिसांनी काढले लोकेशन अन्..

Mumbai Local Viral Video: मुसळधार पावसातही लोकल सुस्साट, पश्चिम रेल्वेने शेअर केला व्हिडिओ; लोक म्हणाले- हेच मुंबईचे स्पिरिट !

Pune Crime : 11 वर्षांच्या मुलीचे कपडे बदलताना फोटो काढले, ब्लॅकमेल करत ५ वर्षे अत्याचार; ४४ वर्षीय नराधमाला बेड्या

SCROLL FOR NEXT