जळगाव

शासन अनूदान दिल तेव्हाच मालमत्ताकरावर ५० टक्के मिळणार सुट  

भूषण श्रीखंडे

जळगाव  : कोरोनाच्या संकटात प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे ५० टक्के मालमत्ताकर माफ करण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात येणार आहे. शासनाने अनुदान दिल्यास हा लाभ मिळेल, असे सभेत ठरविण्यात येणार आहे. शासकीय व आशासकीय ३१ प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. 

जळगाव महापालिकेची पहिली ऑनलाईन महासभा बुधवारी (ता. १२) सकाळी साडेअकराला दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात होणार आहे. सभेत आस्थापना विभागाचा रिक्त जागा, अनंकुपातील जागांबाबत चर्चा होईल. ५० टक्के मालमत्ताकर माफ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असून, शासनाकडून अनुदान मिळाल्यावरच याचा लाभ नागरिकांना मिळणार आहे, अशी माहिती महासभा महापौर भारती सोनवणे यांनी मंगळवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत दिली. 
उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, गटनेते भगत बालाणी, सभागृह नेते ललित कोल्हे, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी उपस्थित होते. 

विषयपत्रिकेवर ३१ विषय 
मिळकतधारकांनी १५ ऑगस्टपर्यंत मालमत्ता कराचा भरणा केल्यास आर्थिक वर्षाच्या मालमत्ताकर आकारणीवर १० टक्के सूट देण्याचा निर्णय, भोईटेनगर येथील रेल्वे मार्गावरील मालधक्का शहराबाहेर हलविणे, महापालिकेत बचत गटामार्फत कॅन्टीन सुरू करणे, महालिका अंतर्गत असलेल्या बालवाडीमधील शिक्षिका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करणे यांसह शासकीय व अशासकीय ३१ प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. 

रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव 
महापालिकेत २०१३ पासून ९४० पदे रिक्त आहेत. अनुकंपा तत्त्वारील ६० उमेदवार प्रतीक्षा यादीत आहेत. त्यातील तीन उमेदवार वयोमर्यादेनुसार अपात्र झाले आहेत. अनुकंपावरील सर्व उमेदवारांना सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावावर निर्णय होणार आहे. 

अशी होणार ऑनलाईन महासभा 
महापालिकेची महासभा ११फेब्रुवारीस झाली होती. मार्चपासून कोरोनामुळे महासभा झाली नाही. महापौरांनी ऑनलाईन महासभेची परवागी मागितली. शासनाने परवानगी दिल्याने तब्बल पाच महिन्यानंतर ऑनलाईन महासभा होईल. महापौर, उपमहापौर, आयुक्त आणि नगरसचिवांसाठी दुसऱ्या मजल्यावर, भाजप व शिवसेनेच्या काही नगरसेवकांसाठी सतराव्या मजल्यावर, तर उर्वरित नगरसेवक घरूनच ऑनलाईन सहभागी होतील. सर्व नियमांचे पालन करून महासभा होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. 

पालकमंत्र्यांनी निधीसाठी पाठपुरावा करावा 
माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी १०० कोटी आणले होते. त्याचप्रमाणे महापालिकेचा ५४ कोटींचा रखडलेला निधी आणण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा भगत बालाणी यांनी केली.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT